Crime News : साडेतीन लाखांचे तीसहून अधिक चोरीचे मोबाईल हस्तगत; दोन सराईत आरोपींना अटक

Crime News : साडेतीन लाखांचे तीसहून अधिक चोरीचे मोबाईल हस्तगत; दोन सराईत आरोपींना अटक

टॅक्सी ड्रायव्हरने बॅचलर असल्याचे भासवून मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले, नंतर सत्य समोर आल्यावर तिची हत्या

मुंबई : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील दोन सराईत आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. विक्रम विजय भोसले आणि बंटी सुरेंद्र भोसले अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे साडेतीन लाखांचे तीसहून अधिक चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत. सध्या ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. (Crime News thirty stolen mobile phones worth three and a half lakhs seized Two accused arrested)

दोन दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांचे एक विशेष पथक महावीरनगर परिसरात गस्त घालत होते. यावेळी तिथे दोन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना पाहताच ते दोघेही पळू लागले. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर गणोरे यांच्या पथकातील दिपक पाटील, नारायण खाडे, अंमलदार जायभाये, जोगलपुरे, नवलू, प्रविण वैराळ, गवळी, म्हात्रे, राणे यांनी पाठलाग करुन दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचा – Mumbai News : मोठी बातमी! नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड जप्त

या दोघांची चौकशी केल्यानंतर ते दोघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील सराईत आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहे. त्यांच्या अटकेने कांदिवली पोलीस ठाण्यातील सहा मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून पोलिसांनी तीस चोरीचे मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत सुमारे साडेतीन लाख रुपये आहे. यातील विक्रम अमरावती तर बंटी वर्धाचा रहिवाशी असून सध्या ते दोघेही कांदिवलीतील महावीरनगर परिसरात राहत होते. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.


कांदिवली-बोरिवली दोन अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : कांदिवली आणि बोरिवलीतील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी समतानगर आणि एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पहिला अपघात बोरिवलीतील न्यू लिंक रोड, गणपत पाटील नगर, गल्ली क्रमांक नऊजवळ झाला. या परिसरात संतोष बसवराज सलगर हा 43 वर्षांचा मृत व्यक्ती राहत होता. त्याची पत्नी आणि दोन्ही मुले मालाड येथे राहत असून गेल्या दोन वर्षांपासून तो त्याच्या पत्नीपासून वेगळा राहत होता. त्याला दारु पिण्याचे व्यसन होते. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता संतोषला एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती नंतर त्याची पत्नी प्रिती सलगरला देण्यात आली. तिच्या तक्रारीनंतर एमएचबी पोलिसांनी अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून चालकाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा – Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना 10 दिवसांची कोठडी

 दुसर्‍या अपघातात साईल जिलानी शेख या 20 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. साईल हा कांदिवली येथे राहत असून 29 मार्चला त्याच्या केटीएम बाईकवरून लोखंडवाला सर्कल, गोदरेज हाईटसमोरून जात होता. भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले. बाईक स्लिप झाल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला शताब्दी रुगणालयात दाखल करण्यात आले होते, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर कूपर रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सोमवारी 15 एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी साईलविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: April 16, 2024 9:49 PM
Exit mobile version