घरक्राइमMumbai News : मोठी बातमी! नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड...

Mumbai News : मोठी बातमी! नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड जप्त

Subscribe

मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस आली असता पोलिसांनी 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये 40 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस आली असता पोलिसांनी 40 लाख रुपयांची रोकड जप्त केली. जप्त करण्यात आलेले 40 लाख रुपये कोणासाठी पाठवले याबाबतचा तपास सध्या पोलीस करत आहेत. (Mumbai News 40 lakh cash seized in Nagpur Mumbai Duronto Express at csmt railway police)

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी स्थानकात नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस उभी होती. या एक्स्प्रेसमधील सामान कक्षातून पार्सल बाहेर काढले जात होते. त्यावेळी एक्स्प्रेसच्या सामान कक्षात एक बॅग आढळली. ही बॅग जीआरपी, आरपीएफ पोलिसांनी ताब्यात घेतली. या बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आढळले. पोलिसांनी तातडीने ही बॅग जप्त केली. त्यानंतर त्या बॅगेतील पैसे मोजले असता, तब्बल 40 लाख रुपयांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

सध्यस्थितीत ही बॅग कोणाची आहे? 40 रोकड कोणी कोणासाठी पाठवली? याबाबतची माहिती अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, रेल्वेच्या सामान कक्षात सामना ठेवताना संबंधिताला पार्सल कोड दिला जातो. त्यानुसार, त्या पार्सल कोडची पडताळणी करून नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसमध्ये पैसे नेमको कोणी ठेवले, याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच, सध्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरात आचारसंहिता सुरू आहे. या काळात जास्तीची रोकड सोबत बाळगता येत नसतानाही एवढी रोकड कोणी आणि कोणासाठी पाठवली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा – Mumbai Crime News : फ्लॅटच्या आमिषाने कलादिग्दर्शकाला 30 लाखांचा गंडा

- Advertisement -

दरम्यान, निवडणुक काळात कोणत्याही व्यक्तीला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येत नाही. मात्र तरीही अनेक जण जास्तीची रोकड बाळगत असल्याची प्रकरण समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीत आयोगाने आपल्या 75 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक रोख रक्कम जप्त केली आहे. सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराकरीता केरळच्या वायनाड मतदारसंघात रवाना होणार होते. त्यावेळी राहुल गांधी तामिळनाडूतील निलगिरीला पोहोचले असता निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉड अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरची तपासणी केली.

लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. यंदा देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीकरीता भाजप आणि काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस आणि भाजपने एकमेकांच्या आश्वासनांवर निशाणा साधत आपल्या योजना सांगत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.


हेही वाचा – Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 2 आरोपींना गुजरातमधून अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -