Dead Body In Ashram : आसाराम बापूच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; पोलिसांकडून आश्रम सील

Dead Body In Ashram : आसाराम बापूच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह;  पोलिसांकडून आश्रम सील

Dead Body In Ashram : आसारामच्या आश्रमात सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; पोलिसांकडून आश्रम सील

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या आसाराम बापूच्या दीर्घकाळ तुरुंगात आहेत. मात्र आसारामचे आश्रम आजही देशाच्या अनेक भागात सुरू आहेत. त्याच्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथील अशाच एका आश्रमातून धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेशातील बहराईच रोडवरील आसाराम बापूच्या आश्रमात गुरुवारी रात्री उशिरा अल्टो कारमधून एका मुलीचा मृतदेह आढळला आहे. ही मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसींनी आश्रमाला सील ठोकले आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात बघ्घ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी घटनास्थळ गाठून 100 जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून घटनास्थळी मोठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आश्रम कर्मचाऱ्यांनी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती

पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गोंडाच्या कोतवाली भागातील बिमौर गावात आसारामचा हा आश्रम आहे. याच आश्रमाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आहे. चौकशीत आश्रमापासून या मुलीचे घर काही अंतरावर असून गेल्या चार दिवसांपासून ते घरातून बेपत्ता असल्याचे समोर आलेय. तसेच ज्या कारमध्ये हा मृतदेह सापडला ती कार देखील अनेक दिवसांपासून आश्रमात उभी होती. मात्र गुरुवारी रात्री उशिरा या आश्रमात उभ्या असलेल्या या कारमधून उग्र वास येऊ लागला, यावेळी आश्रमातील कर्मचाऱ्यांनीन कार उघडून पाहिली तर आतमध्ये मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकचं खळबळ उडाली. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीम आश्रम आणि वाहनाची चौकशी करत आहेत. तसेच आश्रम देखील सील करण्यात आलेय. प्रथमदर्शनी हा खून केल्यानंतर मृतदेह लपवून ठेवल्याची भीती व्यक्त केली जात आहे. असल्याची माहिती आहे.

मृत मुलीच्या आईची प्रतिक्रिया

त्याचवेळी मुलीच्या आईने सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझे पतीही अचानक बेपत्ता झाले. ज्या लोकांनी माझ्या पतीला बेपत्ता केले त्याच लोकांनी माझ्या मुलीची हत्या केली आहे. मुलीच्या आईने काही नामांकित लोकांविरोधात तक्रार दिली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.


इतर भाषिक राज्यांतील लोकांनी इंग्रजीत नव्हे, तर हिंदीत बोलावे, अमित शाहांचा सल्ला


First Published on: April 8, 2022 1:19 PM
Exit mobile version