Kandivali Vaccine scam: कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी आरोपीला बारामतीतून अटक

Kandivali Vaccine scam: कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी आरोपीला बारामतीतून अटक

Kandivali Vaccine scam: कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी आरोपीला बारामतीतून अटक

मुंबईतील कांदिवली बोगस लसीकरण प्रकरणी बारामतीतून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील कोकीलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील कर्मचारी असलेला राजेश पांडे असे या आरोपीचे नाव असून त्याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भेसळयुक्त द्रव हे कोरोनाविरोधी लस असल्याचे भासवून मुंबईतील नागरिकांचे लसीकरण केले जात होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या नामंकित रुग्णालयांचे प्रमाणपत्र देऊन नागरिकांची फसवणूक करत असल्याचेही उघड झाले आहे.

आरोपीला बारामतीतील भिगवण रोड अमृता लॉजवरून ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. लवकरचं आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे. याप्रकरणी त्याची सध्या चौकशी सुरू आहे.राजेश पांडे याने मुंबईतील अनेक भागांत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवत लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते.

यात जवळपास १२ हजारपेक्षा अधिक नागरिकांना ही भेसळयुक्त लस घेण्यात आली. परंतु ३० मे रोजी कांदिवलीतील हिरानंदानी हेरीटेज सोसायटीमध्ये या बोगस लसीकरण प्रकरणाचा भांडाफोड झाला. या प्रकरणात आरोपींनी सोसायटीमधील ३९० सदस्यांकडून प्रत्येकी १२६० रुपये उकळत बनावट कोव्हिड प्रतिबंधक लस दिली. परंतु लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण या आरोपींनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरमध्ये लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र दिले. या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी विविध भागातून आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली १२,४०,००० रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.


 

First Published on: July 1, 2021 11:27 AM
Exit mobile version