जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त

जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त

जुगार खेळणाऱ्या महिलांच्या टोळीवर छापा,३८ हजारांचा माल जप्त

जुगार म्हटले की पुरूषच डोळ्या समोर येतात. पण जुगार हा केवळ पुरूषच खेळतात असा जर समज असेल तर ताबडतोब काढून टाका. कोल्हापूरमध्ये चक्क महिलांचा जुगार अड्डा समोर आला आहे. या प्रकाराने पोलिसांनीही डोक्याला हात लावला आहे. कोल्हापुर पोलिसांनी टाकलेल्या एका छाप्यात महिलांच्या जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली आहे. महिलांना जुगार खेळताना रंगे हात पकडण्यात आले आहे. पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या या महिलांच्या टोळीवर त्वरित कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या इचलकरंजी आणि जयसिंगपूर येथे पोलिसांनी जुगाराच्या अड्यावर छापा मारला. या छाप्यात काही महिला जुगार खेळताना रंगे हात पकडल्या गेल्या. त्याच्यात एका पुरूषाचाही समावेश होता. पोलिसांनी ताबडतोब जुगार खेळणाऱ्या या महिलांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पुरूषाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिला खिशे कापणे, चोरी करणे यासारखे गुन्हे करतात. त्यांच्यावर इतरही अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ३८ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या एकूण ७ महिलांना ताब्यात घेतले आहे. या सातही महिला सराईत चोर आहेत. त्या कोल्हापूरातल्या वेगवेगळ्या भागात चोरी करून पैसे मिळवतात. जुगार खेळणाऱ्या या महिलांवर अनेक गुन्हे दाखल आहेत, असे पोलिसांनी तपासादरम्यान सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीही चार महिन्यांपूर्वी कोल्हापूरमध्ये जुगार खेळणाऱ्या अड्यावर छापा टाकला होता. त्या छाप्यातही काही जुगार खेळणाऱ्या महिलांवर कारवाई करण्यात आली होती.


हेही वाचा – क्राईम पेट्रोल बघून पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट

First Published on: December 6, 2020 7:09 PM
Exit mobile version