प्लेसमेंट एजन्सीचा धक्कादायक कारभार, नोकरीच्या बाहण्याने मुलींची तस्करी

प्लेसमेंट एजन्सीचा धक्कादायक कारभार, नोकरीच्या बाहण्याने मुलींची तस्करी

नोकरीला लावण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यातच अनेकांना फसवणुक केल्याप्रकरणी अटक केली आहे. नोकरीला लावण्याच्या कारणाने अनेकजण पैशांना गंडा घालतात. अशीच एक घटना झारखंडमध्ये उघडकीस आली आहे. झारखंडमधील एका प्लेसमेंट एजन्सीच्या सहाय्याने देशातील महिला आणि मुलींचा देश-विदेशात सौदा करण्यात येत होता. यासाठी प्लेसमेंटला ४० हजारांचे कमिशन मिळत होते. हे कृत्य करणारी स्वतः महिलाच असल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या महिलेला अटक करण्यात आली आहे. पूनमला शुक्रवारी रांची एअरपोर्ट येथून रंगेहाथ पकडले आहे.

पूनम प्लेसमेंट एजन्सीच्या माध्यमातून महिलांची नोकरीच्या बहाण्याने तस्करी करत होती. ती अत्यंत हुशारीने मुलींचा सौदा करत होती. परदेशात नोकरीच्या बहाण्याने पाठवून सौदा केला जात होता. यासाठी तीला एका मुलीच्या बदल्यात ४० हजार रुपये कमिशन मिळत होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर अनेक गुपित समजले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनमला रांची विमानतळावर मानवी तस्करी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले आहे. तिच्यासह ७ मुलींना रांची विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. या मुलींना नोकरी देण्याच्या बहाण्याने रांचीतून दिल्लीला नेण्यात येत होते. परंतु पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. पुनमने आतापर्यंत ५०० मुलींची तस्करी केली आहे. तसेच पुनमचे दिल्लीमध्ये कार्यालयही आहे. मागील ८ वर्षांपासून पूनम मुलींचा सौदा करत असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे.

First Published on: January 31, 2021 5:58 PM
Exit mobile version