सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल

सोनिया गांधींच्या स्वीय सचिवावर बलात्काराचा गुन्हा दाखल

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या स्वीय सचिव पीपी माधवन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिव माधवन यांच्यावर लग्नाचे आणि नोकरी देण्याचे अमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीपी माधवन यांच्याविरोधात कलम 376 ( बलात्कार) आणि कलम 506 (जीवे मारण्याची धमकी देणे) या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 26 जून रोजी पीडित महिलेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांनी नोकरी आणि लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडितेने ती विधवा आहे. तिचा पती काँग्रेसचे होर्डिंग्ज लावण्याचे काम करत होता. मात्र २ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. यावेळी तिने नोकरीसाठी माधवन यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले. दरम्यान, पीपी माधवनने लग्न आणि नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पण माधवन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मी महिलेला ओळखतो. पण तिने केलेले आरोप खोटे आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणावर पोलिसांची प्रतिक्रिया

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोप खरे ठरले तर पीपी माधवन यांनी लवकरचं अटक केली जाऊ शकते. माधवन यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट अंतर्गत गुन्हा दाखल आहेय. त्यामुळे पीपी माधवन यांनी लवकरचं अटक होऊ शकते.


एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती, केंद्राला बजावली नोटीस बजावली


First Published on: June 27, 2022 9:40 PM
Exit mobile version