दिल्लीत 24 तासांत 1109 नवीन कोरोना रुग्ण, तर 9 रुग्णांचा मृत्यू

दिल्लीत 24 तासांत 1109 नवीन कोरोना रुग्ण, तर 9 रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीत 24 तासांत कोरोनाचे 1 हजार 109 इतक्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण 20 दिवसांत 100 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत पॉझिटीव्हिटी रेट 11.23 टक्के आहे. दिवसभरात 1 हजार 687 रुग्ण बरे झाले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत 5 हजार 559 रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे दिल्लीतील आरोग्य विभागाकडून सातत्याने खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 3954 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात 496 रुग्ण उपचार घेत आहेत. तर एकूण 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईमध्ये 138 रुग्ण वाढले आहेत. तर ठाण्यात तब्बल 400 रुग्णांची वाढ झाली आहे. ठाण्यात 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 400 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमध्ये सुद्धा 138 रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, काल शनिवारी राज्यात 1 हजार 855 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे 11 हजार 866 सक्रिय रुग्ण आहेत.


हेही वाचा : जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामधून एका दहशतवाद्याला अटक; रायफलसह मोठा शस्त्रसाठा ज


 

First Published on: August 21, 2022 9:50 AM
Exit mobile version