Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा पुन्हा वाढला, २४ तासांत १,२९७ जणांचा मृत्यू!

Coronavirus: अमेरिकेत मृतांचा आकडा पुन्हा वाढला, २४ तासांत १,२९७ जणांचा मृत्यू!

कोरोना विषाणू

अमेरिकेतील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत कोरोना विषाणूमुळे एक हजार २९७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अमेरिकेत मृतांचा आकडा एक लाख एक हजार ५७३वर पोहोचला आहे. जगात कोरोनामुळे अमेरिकेत सर्वाधिक लोकांचे मृत्यू झाले आहे.

आतापर्यंत अमेरिकेत १७ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून जवळपास संपूर्ण देश बंद असल्यामुळे अडीच कोटी लोक बेरोजगार झाले आहेत.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सर्वात जास्त कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा तीन लाखांहून अधिक असून २३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी झाली. या लोकांनी संपूर्ण सुपरमार्केट लुटले आणि काही सेकंदाच मार्केट रिकामी झाले होते.

दरम्यान अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत देश पुन्हा सुरू करणार असल्याचे सांगत आहे. यासंदर्भात त्यांनी सर्व राज्यांनी आदेशही जारी केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी धार्मिक स्थळे, हॉटेल, बार आणि शाळा त्वरित सुरू करण्यास सांगितले आहे. पण जर राज्यांनी तसे केले नाही तर ते फेडरल सरकारच्या वतीने असा आदेश जारी करतील, असे ट्रम्प म्हणाले. आतापर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा ५८ लाखांहून अधिक असून तीन लाख ६२ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – भारत-चीन सीमा वादामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत – डोनाल्ड ट्रम्प


 

First Published on: May 29, 2020 10:05 AM
Exit mobile version