भारतात तळीरामांची संख्या १६ कोटी

भारतात तळीरामांची संख्या १६ कोटी

प्रातिनिधिक फोटो

भारतात तळीरामांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी १४.६ टक्के भारतीय मद्यपान करतात अशी माहिती समोर आली आहे. देशातील एकून १६ कोटी नागरिका मद्यापन करतात. देशातील एकूण राज्यांपैकी छत्तीसगड, त्रिपूरा, पंजाब, अरूनाचलप्रदेश आणि गोवा याराज्यांमध्ये मोठ्या संख्येने दारूचे सेवन केले जाते असे अहवालात सांगण्यात आले आहे. भारत सरकारकडून नुकताच हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. मद्यानंतर, भांग आणि अम्ली पदार्थांचेही सेवन भारतात केले जाते. मद्यापान करणाऱ्यांपैकी ३८ लोकांपैकी एका भारतीयाला उपचाराची गरज आहे असे अहवालात म्हटले आहे.

देशातून गोळा केली आकडेवारी

या अहवालासाठी भारताताली २ लाख १११ घरांना भेट देण्यात आली. १८९ जिल्ह्यातून ही आकडेवारी गोळा करण्यात आली. मागील १२ महिन्यांमध्ये भारतीयांमध्ये भांग सेवनाचे प्रमाण २.८ टक्के वाढले आहे. सुरुवातीला शो म्हणून सुरु केलेल्या व्यसनाचे रुपांत सवयीमध्ये झालेले अनेकांमध्ये आढळले. ही आकडेवरी १० ते ७५ वर्षीय मानसांमधून काढण्यात आली आहे. या आकडेवारीत ४.६ लाख अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील १८ लाख तरुण आपले व्यसन सोडू इच्छित आहेत.

First Published on: February 19, 2019 3:53 PM
Exit mobile version