काळाचा घाला; १६ व्हराडी वीज कोसळून ठार, नवरदेव बचावला

काळाचा घाला; १६ व्हराडी वीज कोसळून ठार, नवरदेव बचावला

काळाचा घाला; १६ व्हराडी वीज कोसळून ठार, नवरदेव बचावला

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे दरड कोसळणे त्याचप्रमाणे वीज कोसळणे यासांरखे भयंकर प्रकार सातत्याने घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार बाग्लांदेशमधून समोर आला आहे. लग्नासाठी निघालेल्या व्हराड्यांवर काळाला घाला घातला आणि वीज कोसळून १६ व्हराडी जागीच ठार झाले. यात नवरदेव बचावला असून तो केवळ जखमी झाला आहे. लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगाला निघालेल्या व्हराडी मंडळींचा अशाप्रकारे अंत झाल्याने नवरदेवासह दोन्ही कुटुंबीय तसेच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे.

नेमकं काय घडलं?

ही घटना बांग्लादेशच्या चपैनवाबगंज जिल्ह्यातील आहे. इथल्या गावात एक लग्न होते. लग्न नदीकाठच्या गावात असल्याने नवऱ्याकडील व्हराडी मंडळींनी बोटींने वरात काढली. बोटीने जात असताना अचानक मुसळधार पावसासह वीजा कडकडू लागल्या. म्हणून व्हराडी शिवगंज नावाच्या एका गावात आश्रय घेण्यासाठी उतरले. तिथे देखील जोरदार पाऊस सुरू होता. त्या ठिकाणी वीजा कोसळून व्हराड्यापैकी १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. नवरदेव यात जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून अनेक ठिकाणी वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. जुलै महिन्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थान या ठिकाणी तब्बल ६० जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. त्याचप्रमाणे जयपूरच्या आंबेर किल्लावर सेल्फी घेणाऱ्या एका ग्रुपवर वीज कोसळली आणि त्यात ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.


हेही वाचा – Himachal Landslide Video: हिमाचलच्या सिरमौर येथे भूस्खलनाचा थरार, काही क्षणात कोसळला डोंगर

First Published on: August 4, 2021 7:59 PM
Exit mobile version