फेसबुकवरील बॉयफ्रेंडसाठी तिने रचला आईच्या खूनाचा कट

फेसबुकवरील बॉयफ्रेंडसाठी तिने रचला आईच्या खूनाचा कट

प्रातिनिधिक फोटो

फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेम होणे या आता सामान्य गोष्टी झाल्या आहेत. मात्र यातून निर्माण झालेल्या आकर्षणामुळे एका मुलीने आपल्याच आईचा खून घडवून आणला असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. तामिळनाडू येथील तिरुवल्लूर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना अटक केली आहे. या पैकी दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एस. देवीप्रिया असे या मुलीचे नाव असून ती वाणिज्य शाखेच्या दुसऱ्यावर्षी शिकत आहे. ही मुलगी अंजनेयपुरम परिसरात आपल्या आईसोबत राहात होती. फेसबुकवरील बॉयफ्रेड सोबत मिळून तिने हा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. 

नेमका कसा घडला हा प्रकार

एस. देवीप्रिया (१९) ही अंजनेयपुरम परिसरात आपली आई भानूमती बरोबर राहात होती. काही महिन्यापूर्वी एस सुरेश(१९) या तरुणाळी तिची फेसबुकवरून मैत्री झाली होती. काही महिन्यांच्या मैत्रीनंतर या दोघांमध्ये प्रेमाच्या गोष्टी सुरु झाल्या. मात्र हे दोघे कधीही एकमेकांना भेटले नाहीत. आपण मैसूर येथे आयटी कंपनीत काम करत असल्याचे सुरेशने सांगितले होते. 

आईने केला नात्याला विरोध

काही महिन्यांच्या प्रेमानंतर देवीप्रियाने सुरेशबद्दल आपल्या आईला सांगितले. मुली फेसबुकवरील प्रेमसंबधांना आईने विरोध केला. तसेच तिला सुरेशसोबत संबध न ठेवण्यास सांगितले. या विषयावरून आई आणि मुलीमध्ये वाद होत होते.

आई विरोधात बॉयफ्रेंडला केली तक्रार

आपल्या प्रेमसंबधाना आई परवानगी देत नाही अशी तक्रार मुलीने आपल्या बॉयफ्रेंड कडे केली होती. त्यावेळी आईचा काटा काढण्याचा पर्याय सुरेशने दिला. देवीप्रियाही याला तयार झाली. सुरेशने आपल्या शाळेतील दोन अल्पवयीन मुलांना हे काम सोपवले. सुरेशच्या सांगण्यावरून १६ आणि १७ वर्षाची दोन अल्पवयीन मुले देवीप्रियाला भेटली. देवीप्रियाने या दोघांची भेट आईशी करुन दिली. हे दोघे आपले मित्र असल्याची बतावणी देवीप्रियाने केली. एक दिवशी कट रचून देवीप्रिया घराबाहेर गेली. घरी आई एकटी असताना दोन्ही अल्पवयीन मुलांनी घरात घूसून देवीप्रियाच्या आईचा खून केला.

First Published on: December 26, 2018 2:46 PM
Exit mobile version