चमत्कार!! पाच वर्षानंतर ‘ती’ परतली घरी

चमत्कार!! पाच वर्षानंतर ‘ती’ परतली घरी

फोटो सौजन्य - India Today

एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी घटना केदारनाथमध्ये घडली आहे. २०१३ साली केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक जण बेपत्ता झाले. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बेपत्ता झालेले आता काही सापडत नाहीत किंवा परत देखील येत नाहीत त्यामुळे घरच्यांनी, नातेवाईकांनी त्यांच्या जिवंत असण्याची अपेक्षा देखील सोडली. पण, सर्वांना सुखद धक्का देणारी घटना अलिगडमध्ये घडली आहे. २०१३ साली केदारनाथमधील महाप्रलयामध्ये वाहून गेलेली मुलगी पाच वर्षानंतर परत आली आहे. त्यामुळे घरच्यांना आनंद झाला आहे. या साऱ्या प्रकारानंतर हा तर चमत्कार अशी प्रतिक्रिया घरच्यांनी दिली आहे. चंचल असं या मुलीचं नाव आहे. बेपत्ता झालेली चंचल पाच वर्षानंतर अलिगडमधील घरी परतली आहे. घरी आलेल्या नातीला पाहून चंचलच्या आजी, आजोबांचा आनंद आता गगनात देखील मावेनासा झाला आहे. हरिश चांद आणि शकुंतला देवी असं चंचलच्या आजी – आजोबांचं नाव आहे.

वाचा – यमुना नदीत भाविकांची बोट उलटून ३ महिलांचा मृत्यू; ५ बेपत्ता

कशी परतली चंचल घरी

२०१३ साली चंचल आपल्या आई – वडिलांसोबत केदारनाथला गेली होती. त्यावेळी आलेल्या महाप्रलयामध्ये चंचलचे वडिल वाहून गेले तर तिची आई सुदैवानं बचावली. चंचलची आई कशीबशी घरी पोहोचली. ज्यावेळी चंचल बेपत्ता झाली तेव्हा १२ वर्षाची होती. काही समाजसेवकांनी चंचलला जम्मूमधील एका अनाथआश्रमाकडे सोपवलं होतं. चाइल्डलाइन संस्थापक ज्ञानेंद्र मिश्रा यांनी अखेर चंचलला तिच्या अलीगडमधील घरी सुखरूप पोहोचवलं. सुरूवातीला भाषेमुळे चंचलशी संवाद साधणं कठिण गेलं. ती सतत अलिगडबद्दल काहीतरी सांगायचं प्रयत्न करत होती. पण, ती अस्पष्ट बोलत असल्यानं काही अडथळे आले. पण, अखेर साऱ्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि चंचल पाच वर्षानंतर तिच्या घरी सुखरूप परतली.

वाचा – कोट्यवधीच कर्ज; मात्र सुसाईड नोट लिहून कुटुंब बेपत्ता

First Published on: December 25, 2018 8:56 PM
Exit mobile version