घरदेश-विदेशयमुना नदीत भाविकांची बोट उलटून ३ महिलांचा मृत्यू; ५ बेपत्ता

यमुना नदीत भाविकांची बोट उलटून ३ महिलांचा मृत्यू; ५ बेपत्ता

Subscribe

यमुना नदीत भाविकांची बोट बुडाल्याने ३ महिलांचा मृत्यू झाला असून ५ भाविक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता भाविकांचा सध्या शोध सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीमध्ये उलटलीमनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीत भाविकांची बोट उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ५ भाविक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सहा भाविकांना वाचवण्यात यश आलं आहे. सोमवारी सायंकाळी किडगंड ठाणे क्षेत्रात १४ जणांना घेऊन जाणारी बोट मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीमध्ये उलटली. या बोटीतून महाराष्ट्रातील १२ आणि स्थानिक २ असे एकूण १४ जण प्रवास करत होते. हे भाविक या ठिकाणी अस्थी विसर्जनासाठी गेले होते अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

असा घडला अपघात

मनकामेश्वर मंदिराजवळील यमुना नदीमध्ये भाविक अस्थी विसर्जनासाठी गेले होते. सोमवारी सायंकाळी साडेदहा ते सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. या बोटीला छिद्र असल्याने नदीचे पाणी या बोटीमध्ये शिरल्याने बोट हेलकावे घेऊ लागली. पाणीचा बोटीत शिरकाव झाल्याने बोट यमुना नदीत उलटली. बोट उलटल्याने तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाच जण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. तर उर्वरित सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्या सहा जणांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या बोटीमध्ये असणारे भाविक महाराष्ट्राच्या लातूर, नांदेड आणि परभणी येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच बेपत्ता असलेल्यांच्या बचावासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -