अंदमान-निकोबारमधील ‘ही’ बेटं परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जाणार

अंदमान-निकोबारमधील ‘ही’ बेटं परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जाणार

अंदमान आणि निकोबारमधील 21 बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांची नावं दिली जाणार आहेत. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आहे. या निमित्ताने अंदमान-निकोबार बेटांवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात 21 बेटांना परमवीर चक्र किताबाने सन्मानित सैनिकांची नावे दिली जाणार आहेत. व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. (21 andaman islands to be named after param vir chakra awardees pm narendra modi to attend ceremony)

पंतप्रधान कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सकाळी 11 वाजता या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बेट समूहातील 21 सर्वात मोठ्या अनामित बेटांना 21 परमवीर चक्र विजेत्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेत तसेच, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ रॉस बेटांचे नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस बेट असे करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी 2018मध्ये या बेटाला भेट दिली होती. शिवाय, नील द्वीप आणि हॅवलॉक द्वीप यांचे अनुक्रमे शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण करण्यात आले.

२१ परमवीर चक्र विजेत्यांची नावे

मेजर सोमनाथ शर्मा, सुभेदार आणि मानद कॅप्टन (तत्कालीन लान्स नाईक) करम सिंग, एमएम, सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे, नाईक जदुनाथ सिंग, कंपनी हवालदार मेजर पिरू सिंग, कॅप्टन जी. एस. सलारिया, लेफ्टनंट कर्नल (तत्कालीन मेजर) धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग, मेजर शैतान सिंग, सीक्यूएमएच. अब्दुल हमीद, लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुर्जोरजी तारापोर, लान्स नाईक अल्बर्ट एक्का, मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल, फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन, मेजर रामास्वामी परमेश्वरन, नायब सुभेदार बाना सिंग, कॅप्टन विक्रम बत्रा, लेफ्टनंट मेजर कुमार बत्रा, लेफ्टनंट कुमार बत्रा (सुभेदार) तत्कालीन रायफलमन) संजय कुमार आणि सुभेदार मेजर निवृत्त (मानद कॅप्टन) ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव या २१ परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवली जाणार आहेत.


हेही वाचा –भारतीय नौदलात दाखल होणार ‘आयएनएस वागीर’; कलवारी वर्गाची पाचवी पाणबुडी

First Published on: January 23, 2023 10:41 AM
Exit mobile version