२२ वर्षाच्या क्रिकेटपटूने केली सोन्याची तस्करी

२२ वर्षाच्या क्रिकेटपटूने केली सोन्याची तस्करी

नवी दिल्लातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सकाळी २२ वर्षाच्या क्रिकेटपटूसह तिघांना जणांना सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडील असलेलं सर्व सोनं अधिकाऱ्यांनी जप्त केले. ५.२ किलोग्रॅम इतकं सोनं जप्त केले आहे. आताच्या बाजारातील सोन्याच्या किंमती प्रमाणे १.७ कोटी रुपये इतकं सोनं जप्त केलं आहे.

२२ वर्षाचा आरोपी क्रिकेटपटूचे नाव मामिक लुथ्रा असे आहे. २०१६ मध्ये बांगलादेशात झालेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या विश्वकरंडक स्पर्धेत मामिक लुथ्रा खेळला होता. तो कॅनडाच्या संघाकडून प्रतिनिधीत्व करत होता. आपण ही यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणत सोन्याची तस्करी केली आहे असे मामिकच्या वडीलांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना असे सांगितले.

हे चौघेजणं शानिवारी सकाळी विमानतळावर उतरल्यानंतर ग्रीन चॅनेलमधून जात होते. माहिती सीमाशुल्क विभागाला त्यांनी आपल्याकडे सोनं असलेल्यांची माहिती दिली नव्हती. सोन्याची तस्करी होेत असल्याची माहिती ही अगोदरच अधिकाऱ्यांना मिळाली होती. ते ग्रीन चॅनेलमधून बाहेर येताच त्यांची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांच्याकडील असलेल्या बॅगा अधिकाऱ्यांनी तपासून बघितल्या. त्यावेळेस बॅगांनमध्ये संशयास्पद वस्तू आढळल्या.

आरोपींच्या बॅगांची पडताळणी केल्यावर बॅगेत सोन्याचे पाच बार अधिकाऱ्यांच्या डोळ्यास दिसून आले. तसेच त्याबरोबर एक छोटा तुकडाही आढळला. त्या तुकड्याचे वजन २१८ ग्रॅम होते आणि प्रत्येक बारचे वजन हे १ किलो होते.
अटक केलेले सर्व आरोपीचा संबंध हा लुधियानातील एका सोने व्यापाऱ्यारी असलेल्या कुटुंबाशी आहे. तसेच मामिक लुथ्राकडे कॅनडाचा पासपोर्ट असून त्यांचे तिथलेच नागरिकत्व आहे. तर त्यांच्या पालकांचे नागरिकत्व हे भारतातील आहे. अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

First Published on: June 12, 2019 12:47 PM
Exit mobile version