फ्रांसच्या उत्तर किनाऱ्यावर २३०० किलो कोकेन वाहून आले; पोलीसांचा तपास सुरू

फ्रांसच्या उत्तर किनाऱ्यावर २३०० किलो कोकेन वाहून आले; पोलीसांचा तपास सुरू

नवी दिल्ली : फ्रांसमध्ये गुरूवारी (२ मार्च) एक विचित्र घटना समोर आली. फ्रांसच्या उत्तर किनाऱ्यावर मागील काही दिवसांमध्ये २३०० किलो कोकेनने भरलेल्या सीलबंद बॅगा वाहून आल्याचे सूत्रांनी दिली.

रविवारी आणि बुधवारी इंग्लिश चॅनेलमध्ये नॉर्मंडीच्या किनारपट्टीवर कोकेनने भरलेल्या पिशव्याच्या दोन बॅग सापडल्या. ज्याचे एकूण मूल्य 150 दशलक्ष युरो म्हणजे 159 दशलक्ष डॉलर आहे. नॉर्मंडीच्या उत्तरी किनाऱ्यावरील रेविल समुद्र किनाऱ्यावर रविवारी ८५० किलो कोकेनने भरलेल्या बॅगा मिळाल्या, तर बुधवारी विक-सुर-मेर जवळील समुद्र किनाऱ्यावर आणखी सहा पिशव्या सापडल्या.

कोकेन कुठून येत आहे हे अद्याप पोलिसांना समजले नसल्याचे तपासात सहभागी असलेल्या सूत्रांनी एएफपीला सांगितले. परंतु असे होऊ शकते की, अटक टाळण्यासाठी तस्करांनी जानुनबुजून कोकेने पाण्यात टाकले किंवा त्यांच्या बोटीतून कोकेनच्या बॅगा पाण्यात वाहून आल्आया.

हेही वाचा –मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

गुरुवारपर्यंत कोकेनच्या बॅगा मिळाल्या नसल्या तरी स्थानिक सागरी अधिकारी विमानाने या भागाची पाहणी करत आहेत. याआधी २०१९ मध्ये फ्रांसच्या समुद्र किनाऱ्यावर असेच प्रकरण समोर आले होते. त्यावेळी १.६ टन कोकेनने भरलेल्या बॅगा मिळाल्या होत्या.

सरकारने मागच्या वर्षी २७ टन कोकेन जप्त केल्याचे बुधवारी सांगितले. अंतर्गत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२१ च्या तुलनेत मागच्या वर्षी जप्तीमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. ज्यामध्ये वेस्टइंडीज आणि गयानाहून अर्ध्याहून अधिक अंमली पदार्थ येत आहेत.

भारतात सुद्धा समुद्रमार्गे कोकीन
कोकेन तस्कर श्रीलंकेतून मोठा साठा समुद्रमार्गे भारत आणत असल्याचे समजते. जयपूरमध्ये गेल्या काही दिवसांत २५ लाखांच्या कोकेनसह पकडलेल्या तस्कर कुलदीपच्या चौकशीत ही बाब उघड झाली. तामिळनाडूचा मुख्य तस्कर मुर्गननंतर पुष्कर आणि इतर ठिकाणी एजंटमार्फत कोकेनसह इतर अंमली पदार्थांची तस्करी करतो. राजस्थानचे पुष्कर हे देशी-विदेशी पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे.

हेही वाचा – वादग्रस्त अधिकारी रश्मी शुक्ला यांची बदली, सीमा बलाच्या महासंचालकपदावर नियुक्ती 

First Published on: March 3, 2023 9:00 AM
Exit mobile version