National Girl Child Day 2022 : आज राष्ट्रीय बालिका दिन, काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास?

National Girl Child Day 2022 : आज राष्ट्रीय बालिका दिन, काय आहे या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास?

भारत देश खूप वेगाने प्रगती करत आहे. तसेच भारत विकसनशील देशाच्या मार्गावर आहे. देशात दरवर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. आज २४ जानेवारी २०२२ असून संपूर्ण देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जात आहे. हा दिवस साजरा करण्यामागील सर्वा त मोठा उद्देश म्हणजे मुलींना आधार आणि नवनवीन संधी उपलब्ध करून देणे होय. चला तर मग जाणून घेऊयात या दिवसाचं महत्त्व आणि इतिहास काय आहे.

बालिका दिन का साजरा केला जातो?

समाजात मुलींविषयी जागरूकता निर्माण करणं हे या दिवसाचं मुख्य कारण आहे. तसेच मुलींचे हक्क आणि अधिकार, मुलींचे शिक्षण, आरोग्य, सेवा आणि त्यांचे पोषण हा सर्वात मोठा या दिवसाचा उद्देश समजला जातो.

एक काळ असा होता जेव्हा मुलींवर अनेक अत्याचार केले जात असतं. मुलींचे बालविवाह म्हणजेच लहान वयातच लग्न लावून दिलं जायचं. तसेच त्यांना मारणं किंवा छळं करणं हे असे देखील कृत्य त्यावेळी व्हायचे. मात्र, त्याविरोधात आता अनेक कायदे तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार देशातील प्रत्येक मुलींना शिक्षण , आरोग्य सेवा किंवा इतर बाबतीत त्यांना हक्क आणि अधिकार आहेत. त्यामुळे मुलींना सुद्दा मुलांप्रमाणेच हक्क आणि अधिकार समाजात दिले गेले आहेत.

कधी झाली राष्ट्रीय बालिका दिनाची सुरूवात ?

२००८ मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. दरवर्षी सर्व राज्यात हा दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. सर्व राज्य सरकार या दिवसाची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतात. तसेच या दिवसाची थीम वेगवेगळी असते. मागील वर्षात बालिका दिनाची थीम ‘डिजिटल पीढी, हमारी पीढी’ अशी होती. तर २०२० मध्ये मेरी आवाज, हमारा समान भविष्य’ अशी होती. परंतु यंदाच्या वर्षात होणाऱ्या दिनाच्या थीमची घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाहीये.

या दिवसाचं महत्त्व काय?

२४ जानेवारी १९९६ रोजी देशाच्या पहिल्या महिला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या होत्या. महिला सशक्तीकरण्याच्या दृष्टीने हा दिवस भारतीय इतिहासात खूप महत्त्वाचा समजला जातो. त्यामुळे २४ जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत सर्वांना राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


हेही वाचा : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ठोकेन, तोडेन अशी भाषा वापरणं योग्य नाही, चंद्रकांत पाटलांचा आक्षेप


 

First Published on: January 24, 2022 12:36 PM
Exit mobile version