Afghanistan: NIAच्या रडारवर २५ भारतीय, ज्यांचे कनेक्शन दहशतवादी संघटना ISISसोबत!

Afghanistan: NIAच्या रडारवर २५ भारतीय, ज्यांचे कनेक्शन दहशतवादी संघटना ISISसोबत!

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) रेस्क्यू ऑपरेशन बंद झाले असेल तरी अनेक देशातील नागरिक अजून अफगाणिस्तानमध्ये अडकले आहेत. यादरम्यान २५ भारतीय राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) रडारवर आहेत. माहितीनुसार, या सर्व भारतीयांचे कनेक्शन दहशतवादी संघटना ISISसोबत असल्याचा संशय एनआयएला आहे. यामधील काही जणांचा मृत्यू झाला आहे. एनआयएच्या सुत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व भारतीय लोकं अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला जोडलेल्या नंगरहार जवळील भागात आहे.

तपास यंत्रणेने यामधील एक मुनसिब नावाच्या व्यक्तीची ओळख पटली आहे. मुनसिब सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. त्यामुळे एनआयएला मुनसिब ऑनलाईन पद्धतीने आयएसआयएससोबत जोडला असल्याचा संशय आहे.

दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबानने (Taliban) कब्जा केल्यानंतर जेलमध्ये असलेल्या कैदींना सोडले होते. त्यातील अनेक जण दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट खुरासान प्रोविंस (ISKP)मधील दहशतवादी आणि भारतीय पण आहेत. यामुळे अशा परिस्थितीत तपास यंत्रणा यांच्यावर नजर ठेवून आहेत.

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील गुरुद्वारवर २५ मार्च २०२० रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये भारतीय नागरिकांसह २७ लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी दहशतवादी संघटना आयएसकेपीने घेतली. ज्यानंतर एनआयएने १ एप्रिल २०२० रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएची टीम दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी अफगाणिस्तानमध्ये गेली होती.

दहशतवाद्यांनी गुरुद्वारमध्ये घुसून गोळीबार केला होता. या हल्ल्यात केरळमधील व्यक्ती मुहसिन सामील असल्याचा एनआयएला संशय आहे. यानंतर एनआयएला अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या काही भारतीय दहशतवादी संघटनेसोबत जोडले गेल्याचा संशय येऊ लागला. एनआयएच्या सुरुवातीच्या तपासामध्ये २५ भारतीय नागरिकांची नावे समोर आली आहेत, जे अफगाणिस्तानमध्ये राहणारे असून यांचे कनेक्शन दहशतवादी संघटनेसोबत आहे.


हेही वाचा – US troops exit: अमेरिकेने तालिबान्यांना दाखवला इंगा


 

First Published on: September 1, 2021 11:41 AM
Exit mobile version