मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला; २५ जण जखमी

मोदींच्या सभेदरम्यान मंडप कोसळला; २५ जण जखमी

मोदींच्या सभे दरम्यान मंडप कोसळला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभे दरम्यान अपघात झालाय. पश्चिम बंगालच्या मिदनपूरमध्ये आज मोदींची सभा होती. या सभे दरम्यान मंडप कोसळला. या दुर्घटनेमध्ये २५ जण जखमी झाले आहेत. या सर्वांना ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सकाळपासून मिदनपूरमध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे याठिकाणी माती ओली झाली असल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अचानक सभेदरम्यान मंडप कोसळले

पश्चिम मिदनपूरमधील एका कॉलेज ग्राऊंडवर किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. मोदी सभेसाठी पोहचले आणि त्यांनी भाषणाला सुरुवात केली असता सभे ठिकाणी तयार करण्यात आलेल्या मंडपाचा एक भाग कोसळला. मोदींनी मंडप कोसळल्याचे पाहताच भाषण थांबवले आणि पोलिसांना मदत करण्याचे आवाहन केले.

या दुर्घटनेमध्ये २५ जण जखमी झाले. त्यासर्वांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. सभा संपल्यानंतर मोदींनी रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेतली. दरम्यान त्यांनी सर्व जखमींना काळजी करु नये असे आवाहन केले आहे.

राज्य सरकारकडून सर्वांना मदत केली जाईल

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या दुर्घनेमध्ये जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहेत. ‘मिदनापूर रॅलीमध्ये जखमी झालेल्या सर्व जणांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. राज्य सरकार त्यांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करेल.’,असे ट्विटमध्ये ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

First Published on: July 16, 2018 2:52 PM
Exit mobile version