बंगाल: वीज पडल्यामुळे २६ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी शोक केला व्यक्त

बंगाल: वीज पडल्यामुळे २६ जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी शोक केला व्यक्त

दिव्यात वीज पडून वृद्धाचा मृत्यू

बंगालच्या विविध जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू होता. यादरम्यान वीज पडल्याची दुर्घटना घडली. यामध्ये २६ लोकांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुर्शिदाबाद आणि हुगळी जिल्ह्यात ९ ते ११ आणि पश्चिम मेदिनीपुर जिल्ह्यात २ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जखमी झालेल्यांमधील ८ जण मुर्शिदाबाद आणि ६ जण हुगळीचे आहेत. यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना शोक केला व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून म्हणाले की, ‘बंगालच्या विविध भागात वीज पडल्यामुळे आपल्या जवळच्यांना गमावलेल्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे.’

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील ट्वीट करत शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, ‘बंगालमध्ये विविध जिल्ह्यात वीज पडल्यामुळे मृत्यूची घटना खूप दुःखद आहे. मृतांच्या कुटूंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करीत आहे. जखमी लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.’

केंद्र सरकारने वीज पडल्यामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबियांना दोन लाखांची आणि जखमींना ५० हजाराची मदत घोषित केली आहे. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अभिषेक बॅनर्जी बुधवार आणि गुरुवारी मृत्यू झालेल्या लोकांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेणार आहेत. दरम्यान दुसऱ्या बाजूला अलिपूर हवामान कार्यालयाकडू मिळालेल्या माहितीनुसार, ११ जूनला बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. यामुळे बंगलला जोरदार पावसाचा दणका बसेल.


हेही वाचा – Covid-19 विषाणूच्या उगमाबाबत चीनला अधिक माहिती देण्यास भाग पाडू शकत नाही – WHO


 

First Published on: June 8, 2021 9:17 AM
Exit mobile version