जवानांच्या बसवर दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू तर ६ जखमी

जवानांच्या बसवर दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू तर ६ जखमी

जवानांच्या बसवर दरड कोसळली

अरुणाचल प्रदेशमध्ये जवानांच्या बसवर दरड कोसळली. अरुणाचलप्रदेशमध्ये भूस्खलनामुळे इंडो-तिबेटीयन बॉर्डर जवानांच्या बसवर दरड कोसळली. या अपघातामध्ये ४ जवानांचा मृत्यू झाला आहे तर ६ जवान जखमी झाले. जखमी जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर लिकाबली येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

बसवर दरड कोसळली

अरुणाचल प्रदेशमध्ये भूस्खलन झाले. रस्त्याची दुरावस्था असल्यामुळे इंडो-तिबेटीयन बॉर्डर जवानांची बस धिम्या गतीने जात होती. डोंगराळ भाग असल्याने अचानक दरड कोसळली आणि ती बसवर येऊन आदळली. लोअर सिंआंग जिल्ह्यातील बसर अकाजन मार्गावर ही घटना घडली. या अपघातामध्ये बसमधील ४ जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जवान गंभीर जखमी झाले.

बसमध्ये २० जवान होते

गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता ही घटना घडली. लिकाबलीपासून पाच किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. हे जवान पश्चिम सिआंग जिल्ह्यातील बसरवरुन सिआंगला जात होते. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या ६ जवानांवर लिकाबली येथील लष्कर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. या बसमध्ये २० जवान होते. अपघातानंतर आयटीबीपी आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त बचाव पथकाने बचाव कार्य करुन जवानांना बाहेर काढले.

भूस्खलनाची दुसरी घटना

अरुणाचलप्रदेशमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या पाच दिवसामध्ये पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडण्याची ही दुसरी वेळ आहे. २४ जूनला भूस्खलनामध्ये ५ कामगारांचा मृत्यू झाला होता. भूस्खलनामुळे आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अरुणाचलच्या डोंगाराळभागामध्ये रस्त्यावर दरड कोसळल्याच्या घटना वारंवार घडत आहे त्यामुळे मदत अभियान करण्यात अडचणी येत आहेत.

First Published on: June 30, 2018 2:26 PM
Exit mobile version