म्हणून भीम आर्मी उतरली आंदोलनात, दिल्लीतले रस्ते ब्लॉक

म्हणून भीम आर्मी उतरली आंदोलनात, दिल्लीतले रस्ते ब्लॉक

फरीदाबाद स्टेशनवर आंदोलनकर्ते

दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने आज सकाळी जाफराबाद स्टेशनचा प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठीची पर्याय बंद केला. नागरी सुधारणा कायदा (सीएए) विरोधात स्टेशन बाहेर होणारे आंदोलन पाहता डीएमआरसीने हा निर्णय घेतला. तसेच जाफराबाद स्टेशनवर कोणतीही ट्रेन थांबणार नाही असेही डीएमआरसीने जाहीर केले आहे. दिल्ली पोलिसांनीही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था जाफराबाद स्टेशन येथे वाढवली आहे. त्यामध्ये महिला पोलिसांसह अतिरिक्त सुरक्षा रक्षकांचाही समावेश असल्याचे डीएमआरसीमार्फत सांगण्यात आले. शनिवारी रात्रीपासूनच या स्टेशन परिसरात आंदोलनकर्ते जमू लागले होते. जवळपास ५०० महिला आंदोलनकर्ते या स्टेशन परिसरात जमू लागल्या आणि आंदोलन तीव्र होत गेले.

सीएए विरोधी आंदोलन करतानाच भारताचा तिरंगा फडकावतानाच महिलांनी आझादी अशा घोषणा दिल्या. सीएए जोपर्यंत मागे घेणार नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका महिलांनी घेतली आहे. महिलांनी आपल्या हाताला निळा पट्टा बांधतानाच जय भीमच्या घोषणाही दिल्या. महिला आंदोलनकर्त्यांच्या आंदोलनामुले दिल्लीतला मार्ग क्रमांक ६६ ब्लॉक झाला आहे. परिणामी सीलमपुर, मौजपुर आणि यमुना विहारकडे जाणारी वाहतुक रखडली आहे. सीलमपुर येथे आधीच एक आंदोलन सुरू आहे. त्यापाठोपाठच याठिकाणीही काल रात्रीपासून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी दक्षिणपूर्व दिल्ली आणि नॉयडाला जाणारे मार्गही ब्लॉक केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी काही मध्यस्तींची नेमणुक केली आहे.

सीएएमुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश याठिकाणाहून स्थलांतरीत झालेल्या बिगर मुस्लिम लोकांनाही जलदगतीने नागरीकत्व देण्याचा पर्याय खुला होईल. पण हा प्रकार अनधिकृत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नागरिकत्वासाठी धर्म हा चाचणीसारखा होईल असे आंदोलनतकर्त्यांचे म्हणणे आहे.

म्हणून भीम आर्मी आंदोलनात सहभागी

भीम आर्मीचे नेते चंद्रेशेखर आझाद हेदेखील आज आंदोलनात सहभागी होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या नुकत्याच दिलेल्या एका निकालाविरोधात ते आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारला नोकऱ्यांमध्ये तसेच बढतीसाठी आरक्षण अंमलात आणणे सक्तीचे नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निकालाला विरोध करण्यासाठी भीम आर्मी आंदोलनात उतरली आहे.


 

 

 

 

First Published on: February 23, 2020 11:49 AM
Exit mobile version