५जी स्पेक्ट्रम लिलाव; पहिल्याच दिवशी सरकार मालामाल, अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली

५जी स्पेक्ट्रम लिलाव; पहिल्याच दिवशी सरकार मालामाल, अपेक्षेपेक्षा जास्त बोली लागली

भारतातील दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली आहे. ५जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला काल मंगळवारी सकाळी दहापासून सुरुवात झाली. दरम्यान, या लिलाव प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. काल एका दिवसात लिलावाच्या चार फेऱ्या पार पडल्या. या चार फेऱ्यांममध्ये १.४५ लाख कोटींहून अधिक बोली लावल्याची माहिती वैष्णव यांनी दिली.

हेही वाचा -५ जी स्पेक्ट्रमच्या लिलावाला आजपासून सुरुवात; अदानी, रिलायन्ससह चार कंपन्या शर्यतीत

लिलावाचा पहिला दिवस पूर्ण झाल्यानंतर मंगळवारी रात्री केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ५जी स्पेक्ट्रम लिलाव हा असा एकमेव लिलाव ठरला ज्यामध्ये १.४५ लाख कोटींची बोली झाली असेल, असं वैष्णव म्हणाले. मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत बोली सुरू होती. बोली लावणाऱ्यांमध्ये स्पेक्ट्रमची अजूनही मागणी असेल तर आजही लिलाव प्रक्रिया होईल, असं वैष्णव यांनी स्पष्ट केलं. ५जी स्पेक्ट्रम लिलावात सरकारला १.०९ लाख कोटी रुपये मिळतील असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी लावला होता.

सरकार एकूण ७२ GHz स्पेक्ट्रमसाठी लिलाव करणार आहे. याचे मूल्य जवळपास ४.३ लाख कोटी आहे. या लिलावाच्या माध्यमातून कमी फ्रिक्वेंसी बँडमध्ये 600 MHz, 700 MHz, 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, मीड फ्रिक्वेंसी बँडमध्ये  3300 MHz आणि उच्च फ्रिक्वेंसी बँडमध्ये 26 GHz स्पेक्ट्रमचा लिलाव करण्यात येणार आहेत. या नऊ बँडमध्ये जवळपास 72 हजार MHz स्पेक्ट्रमचा लिलाव २० वर्षांच्या कालावधीसाठी होणार आहे. या लिलावाच्या शर्यतीत अदानी डेटा नेटवर्क, (Adani Data Netwrok), रिलायन्स जिओ, भारतीय एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्या शर्यतीत आहेत.

हेही वाचा आयटीआर दाखल करण्यासाठी वेळ वाढवून देण्यास केंद्राचा नकार, काय आहे कारण?

दूरसंचार क्षेत्रातील बदलामुळे मानवी जीवनात क्रांती झाली आहे. आतापर्यंत आपण ४ जी सेवेचा लाभ घेत होतो. ३ जी वरून ४ जी वर येताना झालेला बदल प्रकर्षाने जाणवतो. इंटरनेट सुविधा सुधारली त्यामुळे तंत्रज्ञानातही वेगाने बदल झाला. आता त्यात ५ जी ची भर पडणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान अधिक गतिमान होईल. ५ जी मुळे इंटरनेट सेवेचा वेग वाढल्याने मानवी जीनवमानही तितक्याच गतीने प्रगती करू शकेल. मात्र, या सेवेसाठी ग्राहकांच्या खिशाला अधिक झळ बसू शकते.

५ जी वैशिष्ट्य काय आहेत?

First Published on: July 27, 2022 10:46 AM
Exit mobile version