जगात बाधितांचा आकडा १८ कोटी पार; तर देशात २४ तासांत ६ लाखांहून अधिक चाचण्या!

जगात बाधितांचा आकडा १८ कोटी पार; तर देशात २४ तासांत ६ लाखांहून अधिक चाचण्या!

कोरोना

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ६१ हजार ७१५ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

जगात १८ कोटीहून अधिक जण बाधित

जगात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जगात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली असून सध्या १८ कोटी ४४ लाख २ हजार ८८७ जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ६ लाख ९७ हजार १८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जगात ११ कोटी ६७ लाख २ हजार ८५७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जगात ६ लाख ७३ हजार ४१ जण Active आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात देखील तेवढ्याच वेगाने केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – Corona Live Update: राज्यात २४ तासांत सर्वाधिक १०, २२१ रुग्ण कोरोनामुक्त!


First Published on: August 4, 2020 8:33 AM
Exit mobile version