अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत ६८ हजार ४२८ रुग्णांची वाढ, ९७४ जण मृत्यूमुखी!

अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत ६८ हजार ४२८ रुग्णांची वाढ, ९७४ जण मृत्यूमुखी!

कोरोनाचे मृत्यू

अमेरिकेत कोरोना विषाणूचा थैमान घातलं आहे. जगात कोरोनाचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत ६८ हजार ४२८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ९७४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाख ६० हजार ३६४वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार २०१ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत,अशी माहिती एएफपी न्यूज एजेंसीने दिली आहे.

अमेरिकेत सुरुवातील न्यूयॉर्क हे कोरोनाचे केंद्र होते. पण आता फ्लोरिडा हे कोरोनाचे केंद्र झाले आहे. गुरुवारी फ्लोरिडामध्ये १५६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १४ कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे फ्लोरिडामध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३ लाख १५ हजारांहून अधिक झाला. यापैकी आतापर्यंत ४ हजार ७८२ जणांचा मृ्त्यू झाला आहे. फ्लोरिडामध्ये अमेरिकेतील इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांचा आकडा १ कोटी ३९ लाखांहून अधिक आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख ९२ हजारांहून अधिक जणांचे मृत्यू झाले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे ८२ लाख ७६ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिका, ब्राझील आणि भारत देशात आहेत.


हेही वाचा – चिंताजनक! देशात २४ तासांत आढळले सर्वाधिक ३४,९५६ नवे रुग्ण, ६८७ जणांचा मृत्यू!


 

First Published on: July 17, 2020 9:17 AM
Exit mobile version