भारतीय सैन्याविरुद्ध अपप्रचार करणारी 8 यूट्युब चॅनल्स बंद

भारतीय सैन्याविरुद्ध अपप्रचार करणारी 8 यूट्युब चॅनल्स बंद

केंद्र सरकारने काही यूट्यूब चॅनल्सवर मोठी कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 8 यूट्यूब चॅनल्स ब्लॉक केले आहेत. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी अपप्रचार करणारा आशय या यूट्यूबचॅनल वरून प्रसारित करण्यात येत असल्याच्या आरोपावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. यूट्यूब चॅनलवर भारताच्या परराष्ट्र खात्याशी संबंधित आणि सार्वजनिक व्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती प्रसारित करण्यात आली असा आरोप करण्यात आला. IT नियम 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून केंद्रीय मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. या संदर्भात सरकारने सात भारतीय आणि एक पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सना ब्लॉक केले आहे.

हे ही वाचा – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सुस्साट, रेल्वे मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

सरकारने केलं निवेदन जारी

सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जी युट्युब चॅनल्स ब्लॉक करण्यात आली आहेत. या चॅनल्स कडून धार्मिक भावना नसत करणे, धार्मिक सण आणि उत्सव साजरे करण्यावर बंदी घालणे त्याचबरोबर भारतात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम या युट्युब चॅनलस कडून करण्यात येत होते. सरकारने निवेदनात पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारचे आशय देशातील धार्मिक असंतोष वाढविणारी आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणारी आहे.

भारतीय सैन्यदलाविरोधात चुकीच्या बातम्या प्रसारित केल्याचा आरोप

यूट्यूब चॅनलवर भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर संदर्भातील चुकीच्या बातम्या पसरवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि परकीय राष्ट्रांशी भारताचे जे मैत्रीपूर्ण संबंध यांच्या दृष्टिकोनातून हा आशय पूर्णपणे चुकीचा आहे. त्याचसोबत संवेदनशील असल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा – अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट; 30 जण ठार, 40 हून अधिक जखमी

85 लाखांहून अधिक सब्सक्राइबर

ब्लॉक केलेल्या चॅनल्सना 114 लाखांपेक्षा अधीक व्ह्यूज सुद्धा आहेत. याशिवाय त्या यूट्युब चॅनल्सना संख्या 85 लाखांहून अधिक सब्सक्राइबर सुद्धा आहेत. IT नियम, 2021 अंतर्गत आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करून, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीचा आणि आक्षेपार्ह असा प्रचार आणि प्रसार केल्या प्रकरणी 8 YouTube न्यूज चॅनल्स ब्लॉक करण्यात आले आहेत आहेत.

हे ही वाचा – एअरटेल आणि जिओ ‘या’ तारखेपासून देशात 5G सेवा देण्यासाठी सज्ज

First Published on: August 18, 2022 2:33 PM
Exit mobile version