राजस्थानात काँग्रेसच्या 82 आमदारांचे राजीनामे, गेहलोत सरकार कोसळणार?

राजस्थानात काँग्रेसच्या 82 आमदारांचे राजीनामे, गेहलोत सरकार कोसळणार?

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी सचिन पायलट यांची निवड करण्याचा पक्ष श्रेष्ठींचा विचार आहे. पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध असणाऱ्या काँग्रेसच्या आदमरांपैकी 82 जणांनी आल्या पदाचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशींकडे दिले आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी रविवारी पार पडली. त्यावेळी तिथे काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन आणि माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट हे उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे   फक्त २५ आमदार हजर होते. त्यामुळे पायलट यांच्या विरोधात वातावरण तापल्याचे  सर्वांना पाहायला मिळाले.

नेमके काय घडले –

राजस्थानमध्ये काँग्रेसचे 108 आमदार आहेत. यातील बहुतांश आमदार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे समर्थन करणारे असल्याचे रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी दिसून आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकी आधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशींच्या निवसस्थानी आपल्या पदाचा राजीनाम सादर केला. आबाबत राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी माहिती पत्रकारांना दिली.

दिल्लीत चर्चेसाठी आमंत्रण –

काँग्रेसच्या पक्ष श्रेष्ठींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावल्याचे समजते आहे.  पक्षातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा होणार आहे.

एक व्यक्ती, एक पद –

एक व्यक्ती, एक पद यासाठी  काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आग्रही आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची असल्यास अशोक गेहलोत यांना राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सोडले पाहिजे असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह आहे. मात्र, ते अशोक गेहलोत  आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मान्य नसल्याचे दिसत आहे.

First Published on: September 26, 2022 8:21 AM
Exit mobile version