गर्लफ्रेंडची हत्या लपवण्यासाठी त्याने केले आणखी ९ खून!

गर्लफ्रेंडची हत्या लपवण्यासाठी त्याने केले आणखी ९ खून!

Murder of youth; The body parts were thrown in two sacks into the river

काही दिवसांपूर्वी एका गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सलग दोन दिवस एका विहिरीत मृतदेह आढळून आले आहेत. पहिल्या दिवशी चार तर दुसऱ्या दिवशी पाच मृतदेह आढळून आल्याची घटना तेलंगणमधील वारंगलजवळ असणाऱ्या एका गावामध्ये घडली आहे. यापैकी सहा जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. आता या घटनेची उकल झाली आहे. या घटनेचा तपास लागला आहे. केवळ १ हत्या लपवण्यासाठी खूनीने या सगळ्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी सांगितले की,  आरोपीने आपल्या मैत्रिणीची हत्या केल्याचे रहस्य उघड  होऊ नये. यासाठी हा सगळा खेळ खेळला. या प्रकरणी बिहारमधील प्रवासी कामगार संजय कुमार यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काय घडला प्रकार

गावाजवळ असलेल्या विहिरीमध्ये ४८ वर्षीय कामगाराच्या मृतदेहबरोबरच त्याची पत्नी, मुलगी आणि तीन वर्षाच्या नातवंडाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शुक्रवारी याच विहिरीमध्ये पुन्हा मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी विहिरीमधील सर्व पाणी उपसून बाहेर काढले तेव्हा त्यांना विहिरीमध्ये इतर पाच मृतदेह आढळून आले.

या घटनेची पोलिसांच्या सहा विशेष पथके काम करीत आहेत. सोमवारी अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय आरोपी संजय कुमार यादवने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस तपासात आरोपी संजय कुमार यादव यांने आपल्या प्रेयसी रफिकाच्या हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी हे सर्व केल्याचं कबूल केलं.

निशाची भाची रफीका हिच्याशी संजयचे अनैताक संबंध असल्याचे चौकशीत उघडकीस आले. रफिकासुद्धा पश्चिम बंगालमधील होती, परंतु ती आपल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्याला तीन मुले होती. इथेच संजयने एक खोली भाड्याने घेतली,  जिथे तो रफीकासमवेत राहत होता. रफीकाच्या मुलीवरही काही काळ संजयची नजर असल्याचे त्याने सांगितले. हे कळताच रफिकाने संजयला आपल्या मुलीपासून दूर राहण्याचा इशारा दिला आणि पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यानंतरच संजयने रफिकाला मारण्याचा कट रचला. सात मार्चला संजय आणि रफिका पश्चिम बंगालला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले. प्रवासादरम्यान संजयने रफिकाला अन्नासह झोपेची गोळी दिली. रफिका बेहोश झाल्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबला आणि मृतदेह ट्रेनमधून फेकला.

यानंतर आरोपी संजय वारंगलला परतला. जेव्हा निशाने त्याला रफिकाबद्दल विचारले, तेव्हा त्याने काहीच उत्तर दिले नाही. यानंतर निशाने पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे आरोपी घाबरला आणि त्याने खुनाचा कट रचण्यास सुरुवात केली. आरोपी संजय १६ मे ते २० मेच्या दरम्यान मकसूदच्या कुटूंबाकडे वारंवार जाऊ लागला. याचदरम्यान मकसूदच्या मुलाचा वाढदिवस असल्याचे समजले.

ही माहिती मिळताच आरोपींनी झोपेची औषध खरेदी केली व मकसूदच्या घरी पोहचताच त्याने अन्नात मिसळले. यावेळी मकसूदचा मित्र शकीलही उपस्थित होता. कारखान्याच्या पहिल्या मजल्यावर दोन मजूरही होते. यानंतर, जेव्हा सर्वजण झोपी गेले तेव्हा रात्री बाराच्या सुमारास संजय जागा झाला. त्याने सर्वांना पोत्यात टाकून विहिरीत टाकले.


हे ही वाचा – धक्कादायक! सलग दोन दिवस विहिरीत आढळले मृतदेह


 

First Published on: May 26, 2020 1:36 PM
Exit mobile version