‘अबकी बार.. किती हा विरोधाभास’

‘अबकी बार.. किती हा विरोधाभास’
पेट्रोल- डिझेलसाठी सरकारवरच आली ‘कर्ज’ मागण्याची वेळ

२०१४ च्या निवडणूंकापूर्वी ‘सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात पेट्रोल-डिझेल पुरवू’ असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. मात्र २०१९ च्या निवडणुंकाआधी हेच सरकार जनतेची लूट करत असल्याचे चित्र दिसत आहेत. पेट्रोल-डिझलेच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढलेल्या असताना, आता भाजप सरकारवर पेट्रोल डिझेलसाठी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याची नामुष्की ओढावली आहे.

 श्रीराम फायनान्स देणार कर्ज

‘जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करणार’, ‘पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार’ अशा प्रकारची आश्वासने देणाऱ्या मोदी सरकारच्या राज्यात, पेट्रोल – डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. एवढंच नाही, तर आता सरकारवरच पेट्रोल-डिझेलसाठी कर्ज घेण्याची पाळी आली आहे. श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, १५ ते ३० दिवसांच्या मुदतीवर श्रीराम फायनान्स हिंदुस्थान पेट्रोलियमला कर्ज पुरवणार आहे. सूत्रांनुसार, श्रीराम फायनान्सकडून हिंदुस्थान पेट्रोलियमला मिळणारे कर्ज हे कॅशलेस किंवा कार्डरहित असेल. दरम्यान, घेतलेले कर्ज भारत पेट्रोलियमला १५ ते ३० दिवसांच्या आत परत करावे लागेल. कर्जावरील व्याजाच्या दराबाबात मात्र काही ठोस सांगण्यात आलेले नाही.

भाजपला २०१४ च्या प्रचाराचा विसर – आदित्य ठाकरेंचा टोला
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप सरकारला चांगलाच टोला हाणलाय.  ‘भाजपला २०१४ च्या प्रचाराचा विसर पडलाय’ अशी टीका त्यांनी ट्वीटरवरून केली आहे. ‘२०१४ निवडणुकीच्या वेळी भाजपने सामान्य जनतेला दिलेली आश्वासने ते पूर्ण करु शकणार का?’ असा सवालही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.

मुंबईत पेट्रोल सर्वात महाग

आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेला मुंबईकर इंधन दरवाढीमुळे आता मेटाकुटीला आला आहे. संपूर्ण देशाचा विचार करता सध्या मुंबईत पेट्रोलच्या किंमती सर्वात जास्त आहे. त्यामुळे महागाईला वैतगालेला मुंबईकर चांगलाच होरपळून निघतो आहे. आजच्या घडीला मुंबईत पेट्रोल ८४.४० रुपये प्रतिलिटर दराने तर डिझेल ८४.२५ प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

अरेरे! किती हा विरोधाभास!

२०१४ निडणुकांच्या प्रचारादरम्यान भाजपने जोरदार सोशल मीडिया कॅम्पेन चालवले होते. यावेळी, ‘पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे जनतेची कशी लूटमार केली जात आहे आणि ही लूट केवळ भाजप सरकारच थांबवू शकते, त्यामुळे भाजप सरकारला निवडून द्या’, अशा प्रकारचा संदेश देणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र सध्या देशभारात याच्या एकदम विरोधी चित्र पाहायला मिळते आहे.

पाहा, भाजप सरकारचा ‘तो’ व्हिडिओ…

व्हिडिओ सौजन्य – आप का अनुपम (युट्यूब चॅनेल)

सामान्य जनतेची होरपळ

इंधन दरवाढीच्या या मुद्द्यावरुन देशातल्या सामान्य जनतेमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. पेट्रोल-डिझलेच्या किंमती अक्षरश: गगनाला भिडल्यामुळे लोकांना आपल्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी कर्ज काढावे लागणार का? असा सवाल उपस्थित केला जातो आहे. दरम्यान ‘अच्छे दिन’ आणण्याचे आश्वासन दिलेल्या भाजप सरकारला, सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

 

First Published on: May 22, 2018 5:15 AM
Exit mobile version