Afghanistan: पंजशीरमध्ये ४० साथीदारांचे मृतदेह टाकून तालिबान्यांनी काढला पळ

Afghanistan: पंजशीरमध्ये ४० साथीदारांचे मृतदेह टाकून तालिबान्यांनी काढला पळ

Afghanistan: पंजशीरमध्ये ४० साथीदारांचे मृतदेह टाकून तालिबान्यांनी काढला पळ

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) एका बाजूला तालिबान्यांकडून (Taliban) सरकार स्थापनेची तयार केली जात असून जगासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी चर्चा केली जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला तालिबान पंजशीर (Panjshir) खोऱ्यात अजूनपर्यंत कब्जा करू शकला नाही आहे. अशा परिस्थिती सतत तालिबानी पंजशीरमध्ये घुसखोरी करत आहे. सोमवारपासून पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये (NA) लढाई सुरू आहे. पंजशीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये तालिबान्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे. परंतु नॉर्दर्न अलायन्सच्या मते अजूनपर्यंत तालिबान्यांना घुसखोरीच्या प्रयत्नात यश आले नाही आहे. नॉर्दर्न अलायन्सने म्हटले आहे की, पंजशीरच्या प्रत्येक प्रवेशच्या ठिकाणी आमची करडी नजर आहे. शोतुलमध्ये तालिबान्यांकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण तो प्रयत्न देखील अपयशी ठरला.

मृतदेहांना सोडून गेले तालिबानी

पंजशीरमध्ये तालिबान आणि नॉर्दर्न अयालन्समध्ये गोळीबार सुरू आहे. सतत दोघांमध्ये चकमक होत आहे. यादरम्यान नॉर्दर्न अलायन्स म्हणाले की, जिथे गोळीबार झाला आहे, तिथे ४०हून अधिक तालिबान्यांचे मृतदेह पडले आहेत. आम्ही त्यांना परत देण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस तालिबानी ते मृतदेह सोडून पडून गेले. दरम्यान दिलायादायक बाब अशी आहे की, गुरुवारी तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये कोणत्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही.

तालिबान्यांसमोर आणखीन एक समस्या

पंजशीरमध्ये लढाईमुळे तालिबान्यांसमोर आणखीन एक समस्या आहे ती म्हणजे त्यांच्या साथीदारांवर काबुलमध्ये उपचार होऊ शकत नाही आहेत. कारण काबुलमध्ये अनेक रुग्णालयातील कर्मचारी कामावर परतले नाही आहेत. यामुळे तालिबानला नॉर्दर्न अलायन्ससोबत युद्ध अनेक आघाड्यांवर लढावे लागते आहे.

यापूर्वी तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्समध्ये बातचित करण्याचा प्रयत्न झाला होता. शेर ए पंजशीर अहमद शाह मसूद यांचा मुलगा अहमद मसूद म्हणाले होते की, बातचित करून समस्या सोडवायची इच्छा होती, परंतु दोघांमध्ये कोणतीही बातचित झाली नाही. यादरम्यान तालिबानने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि आता वातावरण युद्धाचे झाले आहे.

तालिबानने जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि काबूलमधील राष्ट्रपती पॅलेसमध्ये घुसले, तेव्हा पण त्यांच्या हातातून पंजशीर दूर होते. तालिबान सतत दावा करत होता की, पंजशीर त्यांच्या ताब्यात आहे. चारी बाजूने घेराव घातला आहे. परंतु अजूनपर्यंत असे काहीही झाले नाही आहे.


हेही वाचा – Afganistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान राज; आज होणार सरकार स्थापनेची घोषणा!


 

First Published on: September 3, 2021 11:54 AM
Exit mobile version