आफ्रिकन मोनालिसा पुन्हा दिसणार!

आफ्रिकन मोनालिसा पुन्हा दिसणार!

फोटो साभार (Bonhams)

नायजेरीयाचा चित्रकार बेन इनवानू यांनी रेखाटलेले आफ्रिकन मोनालिसा हे तैलचित्र पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. नायजेरीच्या राजधानीतील इटलीच्या दुतावासात या चित्राचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. १९७५ नंतर ४० वर्षांनी हे चित्र लोकांना पाहता येणार आहे. या चित्राची किमंत तब्बल ११ कोटी ६७ लाख असल्याचे सीएनएन या वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

या आफ्रिकन मोनालिसाला तूतू (Tutu) पेटिंगही म्हटले जाते. ४० वर्षापूर्वी ही पेंटिग लंडन येथे गहाळ झाली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रकार बेन यांनी नायजेरीत १९७४ साली झालेल्या गृहयुद्धानंतर तीन चित्र रंगवली होती. त्यापैकीच एक आहे आफ्रिकन मोनालिसा.

बेन यांनी ही तीनही चित्रे महाराणी आडेतूतू आडेमिलूयी (तूतू) यांच्या जीवनावर रेखाटली आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बेन यांची इतर दोन चित्रे अजूनही गहाळ आहेत. महाराणी तूतूला एकदा नायजेरीयात फिरताना बेन यांनी पाहिले होते. त्यानंतर त्यांना राणीचे चित्र काढण्याची प्रेरणा मिळाली, असे सांगितले जाते.

First Published on: November 6, 2018 8:13 PM
Exit mobile version