‘त्याला’ 12 वर्षांनंतर धक्क्यांवर धक्के; पत्नीचे खरे नाव समजले अन् धर्मांतरासाठीही धमक्या

‘त्याला’ 12 वर्षांनंतर धक्क्यांवर धक्के; पत्नीचे खरे नाव समजले अन् धर्मांतरासाठीही धमक्या

अयोध्येमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्नाच्या जवळपास 12 वर्षानंतर एका पतीला आपल्या पत्नीचं खरं नाव समजलं आहे. आपल्या पत्नीचं खरं नाव समजताच पतीला मोठा धक्का बसला आहे. इतकचं नव्हे तर पत्नीचं खरं नाव कळताच पतीला इस्लाम धर्म कबूल करण्याचा इशारा देण्यात आला असून जर त्याने इस्लाम धर्म स्वीकारला नाही तर त्याचा शिरच्छेद करू अशी धमकी देखील देण्यात आली आहे. या सर्व प्रकणानंतर पतीने पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
12 वर्षापूर्वी या दाम्पत्याने एकमेकांशी लग्न केलं होतं. मात्र त्यावेळी आरोपी पत्नीने तिचं नाव पूजा असल्याचं सांगितलं होत. मात्र आता 12 वर्षांनी पूजाचं खरं नाव पूजा नसून हसीना बानो असल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तर 2 वर्षांपूर्वी जेव्हा त्यांच्या मुलांचे नाव शाळेत नोंदवण्यात आले तेव्हा पूजाने तिचा मुलगा आयुषचे नाव अनिल असं नोंदवलं आहे. पती जगवीरला या सर्व गोष्टी हळूहळू लक्षात येऊ लागल्यावर त्याने विरोध करायला सुरूवात केली. मात्र त्यावेळी त्याला इस्लाम धर्माचा स्वीकार करण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणावर जगवीरने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

कसं झालं जगवीर आणि पूजाचं लग्न
12 वर्षांपूर्वी जगवीरच्या बहिणीचे पती रामजन्म कोरी यांना फैजाबाद स्टेशन बाहेर एक तरूणी सापडली. त्यावेळी तिने तिचं नाव पूजा असल्याचे सांगितले. रामजन्म कोरी हे त्या मुलीला घरी घेऊन आले आणि तिचं लग्न जगवीरसोबत लावून दिले. लग्नाच्या 10 महिन्यांनंतर त्यांना आयुष नावाचा एक मुलगा झाला. त्यानंतर काही वर्षांनी त्यांना एक मुलगीही झाली.

एकदिवस पूजाला आपल्या मुलांसह नमाज पठण करताना जगवीरने पाहिलं. जगवीरला संशय येताच ती आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली. काही दिवसांनी ती पुन्हा आपल्या सासरी परतली त्यावेळी तिच्यासोबत तिचे आई-वडील, भाऊ देखील तिथे आले आणि त्यांनी जगवीरला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


हेही वाचा :

केरळमध्ये पीएफआय छापेमारीविरोधातील बंदची हाक; अनेक भागात हिंसाचार, जाळपोळ

First Published on: September 23, 2022 3:07 PM
Exit mobile version