मालदीव-श्रीलंका नंतर आयएनएस शार्दुल इराणमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी रवाना

मालदीव-श्रीलंका नंतर आयएनएस शार्दुल इराणमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी रवाना

मालदीव-श्रीलंका नंतर आयएनएस शार्दुल इराणमधून भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी रवाना

कोरोना व्हायरस संकटाच्या दरम्यान अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अभियान सुरू करण्यात आले. काही देशांमधून विमानाद्वारे भारतीयांना मायदेशी आणले जात आहे. तर काही देशांमधून भारतीयांना आणण्यासाठी नौदलाचा सहारा घेतला जात आहे. मालदीव आणि श्रीलंका नंतर आता आयएनएस शार्दुल इराणमधील २०० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी रवाना झाली आहे.

आतापर्यंत आयएनएस शार्दुलमधून २ हजार ८०० हून अधिक लोकांना भारतात परत आणले आहे. आता इराणमधील २०० लोकांना भारतात आणले जाणार आहे.

नौदलाच्या निवेदनात म्हटले आहे की, समुद्र सेतूच्या दुसऱ्या टप्प्यात नौदलाद्वारे इराणामधील लोकांना परत आणले जाईल. आजपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या लोकांना इराणमधून पोरबंदला आणले जाणार आहे. यासाठी इराण येथील दूतावासाने लोकांची यादी तयार करून स्क्रीनिंगची तयारी सुरू केली आहे.

परदेशात अडकलेल्यांना परत आणण्यासाठी नौदलाचे ८ मे रोजी समुद्र सेतू मिशन सुरू झाले होते. आयएनएस शार्दुलशिवाय, जलाश्वने पण मालदीव आणि श्रीलंका मधील लोकांना कोची आणि तुतीकोरिन येथे आणले.

या जहाजांमध्ये लोकांना विविध नियमांचे पालन करावे लागत आहे. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हेल्थ स्क्रीनिंग, टेस्टिंग यासारखे नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानंतर पोरबंदमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला राज्य सरकारच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. आतापर्यंत ५० हजारहून अधिक लोकांना वंदे भारत मिशन अभियाना अंतर्गत भारतीयांना मायदेशी परत आणले आहे.


हेही वाचा – Corona Update: एका दिवसात राज्यात १०९ जणांचा बळी तर २,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण!


 

First Published on: June 8, 2020 9:27 PM
Exit mobile version