घरताज्या घडामोडीCorona Update: एका दिवसात राज्यात १०९ जणांचा बळी तर २,५५३ कोरोनाचे नवे...

Corona Update: एका दिवसात राज्यात १०९ जणांचा बळी तर २,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण!

Subscribe

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आज कोरोनामुळे १०९ बळी गेला आहे. तसेच एका दिवसात २ हजार ५५३ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ३ हजार १६९ वर पोहोचला असून एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८८ हजार ५२८ झाला आहे. तसेच आज १ हजार ६६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत राज्यात एकूण ४० हजार ९७५ बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या राज्यात ५,६४,७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५,७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६,७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- Advertisement -

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १०९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ %)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-१९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ५ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५१, औरंगाबाद -८, रत्नागिरी -३, धुळे – ४, अहमदनगर -१, भिवंडी -१, जळगाव – १, जालना -१, कल्याण डोंबिवली -१, नाशिक – १, पुणे -१, सोलापूर १, ठाणे -१, उल्हासनगर -१आणि वसई विरार १ असे मृत्यू आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       ५००८५ १७०२
ठाणे         १२४१ २२
ठाणे मनपा ५०१६ १२०
नवी मुंबई मनपा ३५९० ८६
कल्याण डोंबवली मनपा १८८७ ३६
उल्हासनगर मनपा ५५३ २१
भिवंडी निजामपूर मनपा २९४ १२
मीरा भाईंदर मनपा ९४६ ३९
पालघर २१४
१० वसई विरार मनपा १३५३ ३५
११ रायगड ७५४ २९
१२ पनवेल मनपा ७०७ २६
१३ नाशिक २५०
१४ नाशिक मनपा ५०४ १९
१५ मालेगाव मनपा ८३८ ६८
१६ अहमदनगर १५६
१७ अहमदनगर मनपा ५२
१८ धुळे ९१ १३
१९ धुळे मनपा १७० १२
२० जळगाव ८१८ १००
२१ जळगाव मनपा २६३ १५
२२ नंदूरबार ४०
२३ पुणे ६६४ १६
२४ पुणे मनपा ८५३७ ३८१
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६७६ १६
२६ सोलापूर ९८
२७ सोलापूर मनपा १३२१ १०४
२८ सातारा ६४० २७
२९ कोल्हापूर ६२३
३० कोल्हापूर मनपा २५
३१ सांगली १५७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३
३३ सिंधुदुर्ग ११३
३४ रत्नागिरी ३७१ १३
३५ औरंगाबाद ५२
३६ औरंगाबाद मनपा १९८४ ९८
३७ जालना २०८
३८ हिंगोली २१४
३९ परभणी ५३
४० परभणी मनपा २५
४१ लातूर १०७
४२ लातूर मनपा ३१
४३ उस्मानाबाद १२५
४४ बीड ५६
४५ नांदेड ३३
४६ नांदेड मनपा १३७
४७ अकोला ५२
४८ अकोला मनपा ७८२ ३०
४९ अमरावती २१
५० अमरावती मनपा २७८ १६
५१ यवतमाळ १६३
५२ बुलढाणा ९५
५३ वाशिम १०
५४ नागपूर ५०
५५ नागपूर मनपा ७११ ११
५६ वर्धा ११
५७ भंडारा ४१
५८ गोंदिया ६८
५९ चंद्रपूर २७
६० चंद्रपूर मनपा १५
६१ गडचिरोली ४४
इतर राज्ये /देश ७५ १९
एकूण ८८५२८ ३१६९
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -