धक्कादायक! २ महिन्याच्या मृत बाळाला रुग्णालयात सोडून आई वडिल फरार

धक्कादायक! २ महिन्याच्या मृत बाळाला रुग्णालयात सोडून आई वडिल फरार

क्वारंटाईनच्या भीतीने वडिलांच्या मृतदेहासोबत मुलींनी ४ दिवस अगरबत्ती लावून काढले, एकीची आत्महत्या

कोरोना महामारीत अनेकांनी आपली जवळची माणसे गमावली आहे. घरातून बाहेर गेलेली व्यक्त सुखरुप परत येऊ देत अशी अपेक्षा करत आज सर्वजण जगत आहेत. कोरोनामुळे अनेकदा जवळच्या व्यक्तीचे अंतिम दर्शनही करु देत नव्हते. आपल्या माणसाचा शेवटचा चेहरा पाहण्यासाठी लोक जिवाचा आकांत करत असतात. गेल्या एक वर्षात अशा अनेक घटना आपल्या जीवाला चटका लावून गेल्या. मात्र जम्मू काश्मीरमध्ये घडलेल्या प्रकारामुळे आई वडिलांच्या नात्याला काळीमा फासला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या दोन महिन्याच्या चिमुकल्या बाळाला टाकून आई वडील रुग्णालयातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या पोटच्या मुलाचा मृतदेह स्वीकारण्याएवजी निर्दयी आई वडिलांनी रुग्णलायातून पळ काढला.

काही दिवसांपूर्वी जम्मू मधील श्री महाराजा गुलाब सिंग रुग्णालायत २ महिन्याच्या बाळाला ह्रदयासंबंधीत त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. बाळावर उपचार सुरु करण्यात. दरम्यान बाळाची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. कोरोनावरही बाळाला उपचार सुरु केले मात्र उपचारांना बाळाने प्रतिसाद दिला नाही आणि बाळाचा रविवारी दुर्देवी मृत्यू झाला. बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे कळताच पालकांनी रुग्णालयातून पळ काढला. रुग्णलयाने बाळाच्या पालकांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र पालक न सापडल्याने त्यांनी बाळाला शवागारात ठेवण्यात आले.

येत्या काही दिवसात बाळाचा मृतदेह स्वीकारण्यासाठी कोणीही आले नाही तर रुग्णालय प्रशासन कोरोना प्रोटोकॉल पाळून बाळावर अंतिमसंस्कार करेल असे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे. नऊ महिने बाळाला पोटात वाढविणाऱ्या आईला आपले मृत बाळ टाकून जाताना काहीच वाटले नसावे असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. माणुसकीला आणि आई वडिलांच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा – कोरोना पळवण्यासाठी महिलांची जलाभिषेकाची शक्कल ! गर्दीतच उरकला जलाभिषेक

First Published on: May 5, 2021 8:27 PM
Exit mobile version