१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार

१ एप्रिलपासून विमान प्रवास महागणार

विमान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण १ एप्रिलपासून देशाअंतर्गत विमान प्रवास महागणार आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालयालयाने प्रवासासाठी ४० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एअरपोर्ट सिक्युरिटी फीमध्ये हवाई वाहतूक महासंचालनालयाने वाढ केल्याने प्रवाशांचे विमान तिकीटामध्ये वाढ होणार आहे. यात आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करणाऱ्यांकडून ११४.३८ रुपयांहून अधिक शुल्क वसुल केले जाणार आहे.

देशभरातील विमानतळांवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) सुरक्षा व्यवस्था पाहतो. या सुरक्षेसाठी विमानतळ प्रशासन प्रवाशांकडून सुरक्षा शुल्क आकरते. याच शुल्कात आता डीजीसीएने वाढ केली आहे. त्यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी २०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी १२ डॉलर म्हणजे अंदाजे ८८२ रुपये सुरक्षा फी वसुल केली जाणार आहे.

देशात सतत होणार इंधन दर वाढ यातच कोरोना महामारीमुळे सुरक्षा साधनांसाठी लागणार खर्च वाढला. त्यामुळे एकंदरीत देशांतर्गत वाहतुकीवर अनेक निर्बंध आल्याने विमान कंपन्याही आर्थिक अडचणीत सापडल्या. याच आर्थिक अडचणीत सापडलेल्या विमान कंपन्यांना सावरण्यासाठी हवाई वाहतूक मंत्रालयाने तिकिटांच्या दरात ५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यात आता सुरक्षा शुल्कात वाढ केल्यामुळे विमान प्रवास अधिक महागणार आहे.

एअरपोर्ट फी प्रत्येक प्रवाशाकडून आकारली जाते. मात्र यातून काहींना कायदेशीर सूट असते. यात दोन वर्षाखालील लहान मुले, ऑनड्यूटी विमान कर्मचारी, कार्यालयीन कामासाठी जाणारा हवाई कर्मचारी, संयुक्त राष्ट्र मोहिमेतील सहभागी प्रवासी, कनेक्टिंग फ्लाइटने प्रवास करणारा प्रवासी, तांत्रिक आणि हवामान बदलांमुळे इतर विमान तळावर दाखल झालेले प्रवासी यांना शुल्कात सुट दिली आहे.


 

First Published on: March 31, 2021 9:53 AM
Exit mobile version