पायलटच्या प्रसंगावधानामुळे कोझिकोड अपघातीची पुनरावृत्ती टळली

पायलटच्या प्रसंगावधानामुळे कोझिकोड अपघातीची पुनरावृत्ती टळली

पुण्यातून देशातील २१ शहरांसाठी २० ऑगस्टपासून विमानसेवा होणार सुरु

रविवारी दिल्लीहून शिर्डीकडे जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे मुंबईला वळविण्यात आले. इंडिगोचे विमान 6E-2019 ने दिल्लीहून शिर्डीला उड्डाण केले पण काही अडचणीमुळे ते मुंबईकडे वळविण्यात आले. विमानामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे की, ‘त्यांना अनेक भयावह परिस्थितींना सामोरे जावे लागले. कोझिकोड विमान अपघात झाल्यानंतरही विमान कंपनीने काही धडा घेतलेला दिसत नाही’, असा प्रवाशांनी आरोप केला आहे.

या घटनेबाबत इंडिया टुडेशी बोलताना गुरुग्राम येथील एक उद्योजक म्हणाले की, ‘देशात आणखी एक अपघात झाला असता.’ हा दिल्ली ते शिर्डी विमानातील प्रवासी होता. तो म्हणाला की, ‘विमानाच्या मेंटेनेसबाबत मोठी चूक लक्षात आली जी एअरलाईन्सने पहिल्यांदाच चेक केली पाहिजे होती. सांयकाळी ४.२५ला आम्ही लोक दिल्लीहून निघालो. शिर्डीमध्ये लँड होण्याअगोदर आम्हाल समजले की, विमानात काहीतरी गडबड आहे. त्यावेळेस क्रूने सांगितले की, एअरपोर्टवर काहीतरी गडबड झाल्यामुळे विमान मुंबईकडे जात आहे. पण विमान मुंबईत पोहोचण्यापूर्वीच कॅप्टनने विमानात जाहीर केले की, विमान लँडिंग गिअरमध्ये काहीतरी गडबड झाली असल्यामुळे विमान मुंबईत आणावे लागले.’

पुढे प्रवासी म्हणाला की, ‘विमानामध्ये सुरुवातीपासूनचे गडबड असल्याचे आम्हाला माहित होते. आम्ही लँडिंग गिअरमध्ये काहीतरी तुटल्यासारखा जोरदार आवाज ऐकला. यानंतर अचानक विमान थांबले. आम्ही खूप घाबरलो होतो. पण त्यानंतर आम्ही मुंबईहून कॅब करून शिर्डीला गेलो.’

दुसऱ्या एका प्रवाशाने उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांना केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘6E 2019 Del-SAG मुंबईकडे वळविण्यात आले जे शिर्डीला जात होते. सर्व प्रवासी एअरपोर्टवर २ ते ३ तास अडकले होते. जर एअरलाईन्सने दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली नसती तर प्रवाशांना रात्रभर मुक्काम करण्याची व्यवस्था केली पाहिजे होती.’ तसेच अनेक प्रवाशांनी या घटनेबाबत संताप देखील व्यक्त केला.


हेही वाचा – पाकिस्तानमधून जोधपूरमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू


 

First Published on: August 10, 2020 4:13 PM
Exit mobile version