प्रवाशाची सिगरेटची तल्लफ भागवण्यासाठी विमानाचे यु-टर्न

प्रवाशाची सिगरेटची तल्लफ भागवण्यासाठी विमानाचे यु-टर्न

(फोटो प्रातनिधीक आहे. )

मानवी स्वभाव किती विचित्र असू शकतो याचा अनुभव एका प्रवासादरम्यान आला आहे. लोकांना असणारी चहा, कॉफीची तल्लफ आपल्याला माहित आहे. पण सिगरेटची तल्लीफ एका प्रवासादरम्यान प्रवाशांना भारी पडली आहे. कारण  विमानाचे उड्डाण घेऊन काही वेळ जात नाही तोच एका प्रवाशाला सिगरेट पिण्याची तल्लफ आली. मग काय या माणसासाठी चक्क विमानाला युटर्न घ्यावे लागले. या प्रवाशामुळे सहप्रवाशांनाही नको त्या मन:स्तापाला सामोरे जावे लागले.

विमान इमारतीला धडकते तेव्हा…

नेमकं काय घडलं ?

दिल्लीच्या इंदिरागांधी एअरपोर्ट विमानतळावर हा सगळा प्रकार घडला आहे. विस्तारा एअरलाईन्सचे  दिल्लीवरुन कोलकाताला जाणारे हे विमान जाणारे होते. संध्याकाळी ५.३० वाजताचे हे विमान होते. या विमानात सगळ्या नियमांप्रमाणे प्रवासी चढले. विमान उड्डाणासाठी सज्ज झाले असता अचानक एका प्रवाशाला सिगरेट पिण्याची तल्लफ आली. त्याने सिगरेट पिण्याची इच्छा क्रू मेंबरकडे व्यक्त केली. पण तो पर्यंत विमान रनवेवर धावायला सुरुवात झाली होती. त्याला कोलकाताला पोहोचल्यानंतर सिगरेट पिण्याची विनंती केली. पण सिगरेट प्यायला शिवाय मी कोलकाताला जाणार नाही. असा हट्ट धरुन तो बसला.

वाचा-Indigo विमानात बॉम्ब ठेवल्याची केवळ अफवा!

विमानाला घ्यावे लागले ‘युटर्न’

एका प्रवाशाच्या हट्टामुळे अखेर पायलेटला युटर्न घ्यावाच लागला. त्याने विमान पुन्हा एकदा दिल्ली विमानतळावर वळवले. सुरक्षेचे सगळे नियम पाळत या प्रवाशाला विमानातून उतरवण्यात आले. पण या एका प्रवाशाच्या नाहक हट्टापायी मात्र इतर प्रवाशांनाही ४३ तासांचा उशीर झाला. विमान उड्डाणासाठी रिकामी स्लॉट न मिळाल्यामुळे प्रवाशांना आणखी उशीर झाला. शिवाय कोलकाताहून दिल्लीकडे येणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा झाला.

First Published on: December 22, 2018 2:38 PM
Exit mobile version