घरदेश-विदेशविमान इमारतीला धडकते तेव्हा...

विमान इमारतीला धडकते तेव्हा…

Subscribe

एअर इंडियाचे विमान स्टॉकहम अर्लांडा विमानतळावर उतरत होते. अवघ्या ५० मीटरवर विमान आल्यानंतर अचानक आपटल्याचा आवाज आला.

१७९ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान एका इमारतीला धडकले. विमान धडकल्यानंतर विमानातील प्रवाशांना तातडीने बागेर काढण्यात आले. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या अपघाताचे नेमके कारण काय हे अद्याप कळले नसले तरी काल संध्याकाळी ५.३० वाजता ही घटना स्विडनमध्ये घडल्याचे समजत आहे.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

एअर इंडियाचे विमान स्टॉकहम अर्लांडा विमानतळावर उतरत होते. अवघ्या ५० मीटरवर विमान आल्यानंतर अचानक आपटल्याचा आवाज आला. हे विमान उतरताना स्टॉकहोम इमारतीला अडकले. विमानाची डावी विंग या इमारतीला धडकली आणि एक जोरदार हादरा बसला. आणि डावे पाते या बिल्डींगमध्येच अडकून राहिले. हे विमान वेळेआधी या विमानतळावर पोहोचले अशी घोषणा पायलट विमानात करत होता. तेवढ्यात हा प्रकार झाला.

दिल्ली फ्लाईट केली रद्द

हेच विमान दिल्ली प्रवासासाठी निघणार होते. पण हा अपघात झाल्यामुळे या विमानाचा दिल्ली दौरा देखील रद्द करण्यात आला. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

- Advertisement -

ऑक्टोबरमध्येही झाला होता अपघात

मुंबईहून दुबाईला निघालेल्या विमानात टेकऑफवेळी अडथळा आला होता. पण तरीदेखील पायलेटने विमान उडवले. जिवीतहानी टाळण्यासाठी हे विमान पुन्हा मागे बोलावण्यात आले. त्यामुळे मोठा अपघात टळला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -