सावधान! ७० लाख भारतीयांच्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या माहितीसह ईमेल-आयडी लीक

सावधान! ७० लाख भारतीयांच्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या माहितीसह ईमेल-आयडी लीक

ऑनलाईन आणि डिजिटल बँकिंगबाबत मोठा खुलासा झाला आहे. ७० लाखहून अधिक भारतीय डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर लिक झाला आहे. इंटरनेट सुरक्षा संशोधकाने ही माहिती दिली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये वापरकर्त्यांची नावे, फोन नंबर, ईमेल आयडी, नियोक्ता कंपन्या आणि वार्षिक उत्पन्न आदींचा समावेश आहे. सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनी हा दावा केला आहे. सुमारे २ जीबीचा डेटाबेस लीक करण्यात आला आहे. वापरकर्त्यांचे खाते कोणत्याप्रकारचे आहे आणि त्यांनी मोबाइल अलर्टवर स्विच केला आहे की नाही, याची माहिती देखील लिक करण्यात आली आहे.

राजाहरिया म्हणाले की हा डेटा २०१० ते २०१९ दरम्यानचा आहे. हा डेटा हॅकर्स आणि घोटाळेबाजांसाठी खूप फायदेशीर आहे. ते म्हणाले, हा आर्थिक डेटा असल्याने याचा हॅकर्स आणि घोटाळेबाजांना खूप फायदा होतो. लीक केलेल्या तपशीलात कार्ड नंबरचा समावेश नव्हता, असे देखील राजाहरिया म्हणाले.

राजाहरिया म्हणाले की, बँकेने क्रेडिट डेबिट कार्डाची विक्री करण्याचा करार केलेल्या तृतीय पक्षामार्फत माहिती लीक झाली असावी. ते म्हणाले की, लीक झालेल्या आकडेवारीत सुमारे पाच लाख कार्डधारकांच्या पॅन क्रमांकाचा समावेश होता. तथापि, ७० लाख वापरकर्त्यांचा डेटा खरा होता की नाही हे स्पष्ट झाले नाही. एखाद्याने हा डेटा/ लिंक डार्क वेबवर विकला आणि नंतर तो सार्वजनिक झाला असे राजाहरिया म्हणाले. वित्तीय डेटा हा इंटरनेटवरील सर्वात महाग डेटा आहे.


हेही वाचा – सरकार कृषी कायदे रद्द करणार नाही; अमित शाह-शेतकरी नेत्यांची बैठक निष्फळ


 

First Published on: December 9, 2020 11:43 AM
Exit mobile version