घरदेश-विदेशसरकार कृषी कायदे रद्द करणार नाही; अमित शाह-शेतकरी नेत्यांची बैठक निष्फळ

सरकार कृषी कायदे रद्द करणार नाही; अमित शाह-शेतकरी नेत्यांची बैठक निष्फळ

Subscribe

केंद्रातील मोदी सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या शतकऱ्यांच्या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंगळवारी झालेली शेतकऱ्यांची बैठक निष्फळ ठरली आहे. अमित शाह यांनी कृषी कायदे मागे घेणार नसल्याचे स्पष्ट सांगितले. याबाबतची माहिती शेतकरी नेते हन्नान मोल्ला यांनी दिली. शिवाय, सरकार आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये बुधवारी ९ डिसेंबरला होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. शेतकरी संघटनांच्या नेत्यांना या संदर्भात लेखी प्रस्ताव पाठवला जाईल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितल्याची माहिती शेतकरी नेते हन्नान मोल्ला यांनी दिली.

गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाला कायद्यात योग्य तो बदल करण्याचा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर काय निर्णय घ्यायचा यासाठी सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. आज दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. सिंधू बॉर्डरवर ही बैठक होणार असून या बैठकीत शेतकरी काय भूमिका घेतात याकडे सरकारचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शेतकरी संघटनांच्या १३ नेत्यांमध्ये मंगळवारी रात्री बैठक झाली. ही बैठक रात्री ११ वाजता संपली. ही बैठक जवळपास २ तास चालली. या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. सरकारने कायदे रद्द करण्यास नकार दिल्याने ही बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आज होणाऱ्या शेतकरी संघटनांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार शेतकरी नेत्यांना काय प्रस्ताव देते आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -