अमेरिकेत गेल्या २४ तासात २१२९ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा ७५ हजाराच्या वर

अमेरिकेत गेल्या २४ तासात २१२९ जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा ७५ हजाराच्या वर

कोरोना विषाणू महामारी संपूर्ण जग हतबल झालं आहे. अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक कहर केला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये अमेरिकेत २ हजार १२९ लोक मरण पावले आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनेत चढ उतार होत आहे.

अमेरिकेच्या गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूमुळे २ हजार १२९ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा ७६ हजार ९३८ वर पोहोचला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाधीतांचा आकडा १२ लाख ९२ हजार ८५० वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत २ लाख १७ हजार २५१ जण बरे झाले आहेत. जगभरात कोरोनाचे ३९ लाख १७ हजार ९४४ जण कोरोनाबाधित आहेत. तर २ लाख ७० हजार ७४० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ लाख ४४ हजार २६० जण बरे झाले आहेत.

कोविड -१९ ची वुहानच्या प्रयोगशाळेतुन निर्मिती – पोम्पिओ

कोविड -१९ ची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेतुनच झाली, याबाबतची पुरावे ट्रम्प प्रशासनाकडे आहेत, असं अमेरिकेच्या विदेश मंत्री माइक पोम्पिओ यांनी बुधवारी सांगितलं. पोम्पिओ यांनी ‘फॉक्स न्यूज’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं कि, “आम्ही याबद्दलची माहिती जमा केली आहे, मात्र, मी याबद्दल काही सांगू शकत नाही, परंतु आमच्या जवळ इतकी माहिती आहे की आता आम्ही या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवू शकतो.”


हेही वाचा – विशाखापट्टणम वायू गळती: काय आहे नेमका स्टायरिन गॅस?


 

First Published on: May 8, 2020 11:29 AM
Exit mobile version