डोळ्यांमार्फत देखील पसरू शकतो जीवघेणा कोरोना! तज्ज्ञांनी केला खुलासा

डोळ्यांमार्फत देखील पसरू शकतो जीवघेणा कोरोना! तज्ज्ञांनी केला खुलासा

प्रातिनिधीक फोटो

आतापर्यंत असे सांगितले जात होते की, कोरोना हा नाक आणि तोंडाद्वारे पसरतो. मात्र तज्ज्ञांनी यासंदर्भात एक नवीन खुलासा केला आहे. त्यांच्या मते, हा जीवघेणा व्हायरस डोळ्यांमार्फत पसरू शकतो. म्हणजेच डोळ्यांचे संरक्षण करणं हे देखील आवश्यक झाले आहे. तसेच जर एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीला खोकला झाला असेल किंवा तो शिंकला असेल तर त्याच्या नाकाद्वारे तसेच त्याच्या तोंडासह डोळ्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो.

एखाद्या व्यक्तीचा हात जीवघेणा व्हायरसच्या संपर्कात आला आणि त्या दूषित हातांनी डोळ्यांना स्पर्श केला तर संसर्ग होण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर तज्ज्ञांचे असे मत आहे की, संक्रमित व्यक्तीचे अश्रू देखील कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

वारंवार हात धुतल्याचे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आणि चेहरा झाकल्याने कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकते. अमेरिकन अकेडमी ऑफ ऑप्थॅल्मोलॉजीनुसार, चष्मा घातल्याने या जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो.

हा कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी बाधित रूग्णांवर उपचार करतांना आरोग्य सेवेच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांनाही चष्मा घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यावेळी, यूएस रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्रेच्या मते, कानामार्फत कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची कोणतीही शक्यता नाही. याआधी केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवण्याचा नियम पुरेसा नाही तसेच प्राणघातक व्हायरस शिंकण्याने किंवा खोकल्याने २० फुटांपर्यंत पसरू शकतो.

वैज्ञानिकांनी केलेल्या त्याच्या अभ्यासातून असेही आढळले की, कोरोना हिवाळ्यात आणि दमट हवामानात तीनपट वेगाने वाढू शकतो. शिंका येणे किंवा खोकल्यामार्फेत बाहेर पडणारे संक्रामक थेंब हा व्हायरस २० फुटांपर्यंत पसरू शकतो. वैज्ञानिकच्या मते, शिंका येणे, खोकला आणि सामान्य संभाषणातूनही साधारण ४० हजार थेंब बाहेर पडू शकतात.


कोरोना झालं, वादळ झालं आता ६ जूनला येणार नवं संकट! नासाने दिला इशारा
First Published on: June 4, 2020 8:09 PM
Exit mobile version