अंतराळातील संशोधकांसाठी नासा पाठवणार १७० कोटींचे शौचालय!

अंतराळातील संशोधकांसाठी नासा पाठवणार १७० कोटींचे शौचालय!

अमेरिकेतील नासा आता २.३ कोटी डॉलर म्हणजेच १७० कोटी रुपयाचे शौचालय इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) ला पाठवणार आहेत. तिथे याच्या वापराच्या अनुभवावरून चंद्र आणि मंगळ ग्रहांवरील शोधमोहिम केली जाणार आहे. हे शौचालय इतर सामानांसह २९ सप्टेंबर रोजी वर्जिनियाच्या नासामधून फ्लाइट फॅसिलिटीतून आंतराळात पाठवले जाणार आहेत. तेथे पाठवण्यात येणाऱ्या स्पेस टॉयलेटला युनिव्हर्सल वेस्ट मॅनेजर सिस्टमचे नाव देण्यात आले आहेत. हे आकाराने लहान तसेच सर्व सुविधा असलेले आहेत.

सध्या जे शौचालय आयएसएसमध्ये उपलब्ध आहे, त्यापेक्षा हे ६५ टक्के छोटे आणि ४० टक्के वजनाचे हलके आहे. या शौचालयाला ऑरियन आंतराळ यानातही वापरले जाणार आहे. हे यान आंतराळात प्रवाशांना दहा दिवसांत चंद्रावर घेऊन जाईल तसेच परत घेऊनही येईल. या नव्या शौचालयात मलमूत्राची व्यवस्था करण्यात आली आहे. नासातील आंतराळ यात्री जेसिका मिअर यांनी सांगितले की, आम्ही मूत्र, घाम आणि इतर तरळ पदार्थांना ९० टक्के प्रमाणात शोषून घेण्यायोग्य बनवले आहे. ज्याचा नंतर वापर केला जाणार आहे. नासाचे आंतराळ यात्री केट रूबिंस यांनी सांगितले की, आपलं पुढील मतदान ते आंतराळातून करू इच्छितात. पृथ्वीपासून २०० किमीपासून दूर आंतराळातून ते मतदान करण्याची योजना बनवत असल्याचे त्यांनी शुक्रवारी माध्यमांना सांगितले.

हेही वाचा –

एनडीए नव्हे भाजप प्रणित आघाडी : शिवसेनेचा टोला

First Published on: September 28, 2020 12:43 PM
Exit mobile version