घरदेश-विदेशएनडीए नव्हे भाजप प्रणित आघाडी : शिवसेनेचा टोला

एनडीए नव्हे भाजप प्रणित आघाडी : शिवसेनेचा टोला

Subscribe

'आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल.

‘सत्ता आली, सत्ता गेली. अनेक घटक पक्ष सोयीनुसार सोडून गेले, पण शिवसेना व अकाली दल हे एनडीएचे दोन खांब कायम भाजपबरोबर राहिले. आता या दोन्ही पक्षांनीही एनडीएला राम राम ठोकला आहे. त्यामुळे एनडीएत खरच राम उरला आहे काय?,’   त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल,’ असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

कृषी विधेयकांच्या मुद्द्यावरून अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा सुंठी वाचून खोकला गेला या अविर्भावात भाजपने अकाली दलाच्या मंत्र्यांचे राजीनामे तडक स्वीकारले. मात्र आता बादल हे सुद्धा एनडीएतून बाहेर पडत असताना त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केले नाही. शिवसेनेनंतर अकाली दलाच्या रूपानं भाजपचे सर्वात जुने व सुरुवातीचे दोन्ही मित्र पक्ष आता बाहेर पडले. शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून या घटनाक्रमावर भाष्य करताना भाजपवर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेपाठोपाठ अकाली दलही बाहेर पडल्याने राष्ट्रीय राजकारण बेचव झाले असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.  ‘ज्या कारणांसाठी ‘एनडीए’ स्थापन झाली ते कारणच मोदींच्या झंझावातात नष्ट झाले. अकाली दल हा ‘एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला आहे.   राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचे राजकारण निस्तेज होताना दिसत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दोन सार्वत्रिक निवडणुका जिंकल्या. अनेक राज्यांत त्यांची सत्ता आहे. जेथे अल्पमत होते, तेथेही या ना त्या मार्गाने सत्ता मिळविली. केंद्रीय सत्तेचे बाहुबल हाती असले की, काहीच अशक्य नसते, पण सत्तेचे ‘गड’ जिंकले तरी एनडीएतील दोन सिंह मात्र गमावले आहेत, हे वास्तव कसे नाकारणार?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.   पंजाब आणि महाराष्ट्र ही दोन मर्दानी बाण्याची राज्ये आहेत. अकाली दल व शिवसेना हे त्या मर्दानगीचे चेहरे आहेत. आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीत नक्की कोण कोण आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. जे आहेत त्यांचा हिंदुत्वाशी नक्की किती संबंध आहे? ‘आधी शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे दोन प्रमुख स्तंभच बाहेर पडल्याने आता या आघाडीचे म्हणजेच एनडीएचे अस्तित्व खरोखर उरले आहे काय? हा प्रश्न आहेच. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणण्यापेक्षा भाजपप्रणीत आघाडी हाच उल्लेख करावा लागेल,’ असा चिमटा शिवसेनेने काढला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -