CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत कोरोनाचे १ हजार ७३८ बळी!

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा कहर; २४ तासांत कोरोनाचे १ हजार ७३८ बळी!

औरंगाबादमध्ये नव्या ४५ रुग्णांची वाढ; ७३७ रुग्णांवर उपचार सुरु

जगात कोरोना व्हायरस थैमान घातले आहे. संपूर्ण जगात कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. चीनमध्ये उद्यास आलेल्या या कोरोना व्हायरसचा अजूनही अमेरिकेत कहर सुरुच आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांता १ हजार ७३८ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु मागील दिवसांच्या तुलनेत आकडेवारी मृतांच्या संख्येत घट होत आहे असल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाने दिली आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ४६ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या मृतांच्या आकडेवारीत अमेरिका पहिला क्रमांकावर आहे.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसचा अमेरिकेवर हल्ला झालाय असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, हा अमेरिकवर हल्ला झाला आहे. हा एक व्हायरस नसून हा एक हल्ला आहे. आतापर्यंत कोणी असे पाहिले नाही. १९१७ मध्ये असे घडले होते. कोरोना व्हायरसच्या या संकटात अमेरिकेत आतापर्यंत कोट्यावधी डॉलर्सचे पॅकेज जाहीर केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना हा अमेरिकेवर हल्ला असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आपल्याकडे अजून काही पर्याय नाही आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या समस्येच निरसण करायचे आहे. मी प्रत्येक घटनावर लक्ष ठेवतो. जगात सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. चीनपेक्षा मोठी आहे किंवा जगातील इतर देशापेक्षा ही अर्थव्यवस्था मोठी आहे. गेल्या तीन वर्षात आपण उभे केले आहे आणि अचानक हा व्हायरस येऊन बंद करायला सांगतो. आता पुन्हा आम्ही हे खुले करत आहोत आणि पूर्वीच्या तुलनेत आणखी मजबूतीने आपण यातून उभारी घेऊ. पण फक्त त्यासाठी पैसे खर्च करावे लागणार आहेत, असे ट्रम्प म्हणाले.


हेही वाचा – अखेर क्रुझवर अडकलेले १४७ खलाशी उतरले मुंबई बंदरावर


 

First Published on: April 23, 2020 2:21 PM
Exit mobile version