घरताज्या घडामोडीअखेर क्रुझवर अडकलेले १४७ खलाशी उतरले मुंबई बंदरावर

अखेर क्रुझवर अडकलेले १४७ खलाशी उतरले मुंबई बंदरावर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नाने अखेर मरिला डिस्कव्हरी या एका मोठ्या क्रुझ शिपवर महिन्याभरापासून अडकून पडलेल्या १४७ भारतीय खलाशी आणि नाविक आज मुंबई बंदरावर उतरले आहेत. मागील महिन्यापासून मरिल डिस्कव्हरी या जहाजावर मुंबईसह देशातील अनेक राज्यातील खलाशी अडकले होते. आज हे सर्व खलाशी मुंबईत बंदारावर उतरले असून वैद्यकीय तपासणी करून मुंबईतील हॉटेलवर त्यांना क्वारंटाईन केले जाणार आहे. जहाज युरोपासाठी रवाना होणार आहे.

२ ते ६ एप्रिल या कालावधीत मरिला डिस्कव्हरी ही क्रुझ कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहचणार होती. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आणि या क्रुझने लाएम चाबँग या थायलँड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. ही क्रुझ १२ एप्रिल रोजी कोचीन येथे पोहचली पण या क्रुझवरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर ही क्रुझ मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहचली आणि तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोना लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. थायलँड सोडून ३७ दिवस होऊन गेले होते मात्र जहाजावर कुठलाही संसर्ग नसल्याचे कंपनीने सांगितले तरी परवानगी मिळत नव्हती.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात नौकानयन मंत्रालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. प्रधान सचिव विकास खारगे, आशिष कुमार सिंह आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया हे सातत्याने पाठपुरावा करीत होते.


हेही वाचा – LockDown: ३ मेपर्यंत सर्व मोबाईल युजर्सना मिळणार मोफत इंटरनेट सेवा!, घ्या सत्य जाणून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -