काँग्रेसला सैन्यावर संशय, तर आम्हाला गर्व – अमित शहा

काँग्रेसला सैन्यावर संशय, तर आम्हाला गर्व – अमित शहा

भाजप अध्यक्ष अमित शहा

काँग्रेसला सैन्यावर संशय आहे, तर आम्हाला सैन्यावर गर्व आहे, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा म्हणाले आहेत. अमित शहा यांनी भाजप आणि काँग्रेस यांच्यातीसल फरक स्पष्ट केला आहे. आज इंडीयन ओव्हरसीस काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सॅम पित्रोदा यांच्यावर सडकून टीका केली आहे. यानंतर आता अमित शहा यांनी देखील काँग्रेसवकर टीका केली आहे. यासोबतच अमित शहा यांनी नरेंद्र मोदी यांचे ट्विट रिट्विट केले आहे. काँग्रेसवर टीका करताना अमित शहा यांनी भाजप आणि काँग्रेसमधील फरक स्पष्ट केला आहे.

हेही वाचा – काँग्रेस पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करत आहे – नरेंद्र मोदी

नेमकं काय म्हणाले अमित शहा?

अमित शहा यांनीदेखील आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. अमित शहा म्हणाले की, ‘विरोधी पक्ष आणि भाजप यांच्यातील फरक स्पष्ट आहे. त्यांना आपल्या सैन्यावर संशय आहे आणि आम्हाला आमच्या सैन्यावर गर्व आहे. काँग्रसचे हृदय दहशतवाद्यांसाठी धडकते तर आमचे तिरंग्यासाठी धडकत असते.’ यावेळी ते जनतेला आवाहन करतात की, ‘तुमचे मत हे शक्तीशाली आहे. त्याचा उपयोग करुन काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक करा.’


हेही वाचा – २६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही – सॅम पित्रोदा
 

First Published on: March 22, 2019 1:13 PM
Exit mobile version