घरदेश-विदेशकाँग्रेस पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करत आहे - नरेंद्र मोदी

काँग्रेस पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस साजरा करत आहे – नरेंद्र मोदी

Subscribe

भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्न उपस्थिक केले आहेत. सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि इंडीयन ओव्हरसीसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर २६/११ च्या हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही, असेही म्हणाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅम पित्रोदा यांच्यावर सडकून टीका केली आहे. काँग्रेस अध्यक्षांचा सर्वात विश्वासू सल्लागार आणि मार्गदर्शक यांनी भारतीय सैन्याची निंदा करुन पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिवसाचा उत्साह साजरा करण्यास सुरुवात केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सॅम पित्रोदांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे. २३ मार्च हा पाकिस्तानचा राष्ट्रीय दिवस आहे. या दिवसाच्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर सॅम पित्रोदा यांनी असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – २६/११ हल्ल्यात पाकिस्तानचा दोष नाही – सॅम पित्रोदा

नेमकं काय म्हणाले मोदी?

या संदर्भात पंतप्रधान नरेंदेर मोदी म्हणाले की, ‘दहशतवादाला प्रतिकार करण्याची इच्छाच काँग्रेसच्या नेत्यांची नव्हती. मात्र, हा नवा भारत आहे. आम्ही दहशतवादाला प्रतिकारही देणार आणि सडेतोड उत्तरही देणार.’

- Advertisement -

हा सैन्याचा अपमान – मोदी 

यासोबतच मोदी म्हणाले की, विरोधक देशाच्या सैन्याचा अपमान करत आहे. मी माझ्या भारतीय जनतेला आवाहन करतो की, विरोधी पक्षनेत्यांना त्यांच्या वक्तव्यावर प्रश्वन विचारा. त्यांना सांगा की १३० करोड भारतीय विरोधकांचे वादग्रस्त वक्तव्य आणि कामे कधीच विसरणार नाही. जनता भारतीय सैन्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -